coronavirus china wuhan conducted 1470950 tests vrd
Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊल By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 11:39 AM1 / 12कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवलेला असून, अनेक जण त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोरोनाचं केंद्रबिंदू चीनमधील वुहान असल्याचं अमेरिकेकडून वारंवार सांगितलं जात आहे. 2 / 12 चीन संशयाच्या फेऱ्यात अडकला आहे. अनेक जागतिक स्तरावरचे देश चीनकडे संशयाच्या नजरेनं पाहतात. कोरोनामुळे जगाच्या केंद्रस्थानी आलेल्या चीननं आता कोरोनाविरोधातच मोठं पाऊल उचलल्याचं सांगितलं आहे. 3 / 12वुहानमध्ये 14.7 लाख कोरोना विषाणू चाचणी घेण्यात आल्याचा दावा चीनने केला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. त्याचबरोबर गुरुवारी 10 लाख लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. 4 / 12आतापर्यंत इतर कोणत्याही देशातील एका शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्याची माहिती समोर आलेली नाही.5 / 12काही दिवसांपूर्वी चीनने वुहानच्या संपूर्ण लोकसंख्येची कोरोना चाचणी घेण्याचे ठरविले. चिनी अधिका-यांनी यापूर्वी सांगितले होते की, 2 आठवड्यांत त्यांना वुहानच्या 1.1 कोटी लोकसंख्येची चाचणी घ्यायची आहे.6 / 12चीनने एका दिवसात वुहानमधील 14.7 लाख लोकांची Nucleic Acid तपासणी केली. 8 एप्रिल रोजी वुहान येथून लॉकडाऊन हटविण्यात आला होता. 7 / 12लॉकडाऊन काढून टाकल्यानंतर कोरोनाची प्रकरणे पुन्हा उघडकीस येऊ लागली, तेव्हा चीनने 14 मेपासून वुहानमध्ये कोणतीही लक्षणे नसलेल्या लोकांसाठी कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली.8 / 12वुहान हे एक असं ठिकाण आहे, जिथून कोरोना विषाणूची उत्पत्ती झाली आणि त्याचा जगभरात संसर्ग सुरू झाला. वुहानमधूनच कोरोना जगभर पसरला.9 / 12चीनच्या अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशातील एकूण 84 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4600 लोक मृत्युमुखी पडले आहेत. 10 / 12. वुहानमध्ये आता परिस्थिती चांगली असल्याचे चीनचे म्हणणे आहे. 11 / 12जगभरात कोरोना विषाणूची 53,11,089 पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 3,42,104 लोकांनी आपला जीव गमावला आहे.12 / 12जगभरात कोरोना विषाणूची 53,11,089 पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 3,42,104 लोकांनी आपला जीव गमावला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications