coronavirus: Corona infiltration into the Amazon rainforest in Brazil BKP
coronavirus: चिंताजनक! अॅमेझॉनच्या जंगलातही कोरोनाचा शिरकाव, अनेक आदिवासी जमातींचे अस्तित्व संकटात By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 4:56 PM1 / 9चीनमधून पसरण्यास सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूने आता संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. चिंताजनक बाब म्हणजे आधुनिक मानवाची फारशी वर्दळ नसलेल्या जगातील अनेक दुर्गम भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. जगातील सर्वात धोकादायक आणि जागतिक पर्यावरणाचे फुप्फूस समजल्या जाणाऱ्या अॅमेझॉनच्या जंगलापर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहोचला असून, येथील आनेक आदिवासी जमातींमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तसेच शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. (छायाचित्र सौजन्य - रॉयटर्स)2 / 9ब्राझीलमधील अॅमेझॉनच्या जंगलात आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे ६० विविध जमातींच्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत इथे कोरोनाचे ९८० रुग्ण सापडले असून, १२५ जणांचा मृत्यू झाला आहे. (छायाचित्र सौजन्य - रॉयटर्स)3 / 9अॅमेझॉनमधील परिसराची देखरेख करणाऱ्या ब्राझीलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रदेशात सर्वसामान्य आयोग्य सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे इथे कोरोनाचा संसर्ग वेगाने होऊ शकतो. 4 / 9अॅमेझॉनच्या जंगलांमध्ये कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर १२.६ टक्के आहे. तर संपूर्ण ब्राझीलमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर हा ६.४ टक्के आहे. 5 / 9ब्राझीलमध्ये सुमारे ९ लाख आदिवासी असून, अॅमेझॉनच्या घनदाट अरण्यांमधील गावांत त्यांचे वास्तव्य आहे. अॅमेझॉनमध्ये एप्रिल महिन्यामध्ये कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. 6 / 9आदिवासी समुहाचे लोक बाहेरील व्यक्तींना आपल्या भागात येऊ देत नाहीत, अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा फैलाव येथील जंगलांमध्ये झाला कसा याचा शोध आता ब्राझील सरकारकडून घेण्यात येत आहे. 7 / 9येथील ९० टक्के आदिवासी समुहांच्या गावांपासून आयसीयूची उपलब्धता असलेली रुग्णालये ३२० किमी अंतरावर आहेत. तर १० टक्के आदिवासी गावांपासून अशी रुग्णालये ७०० ते १ हजार किमी अंतरावर आहेत. 8 / 9या आदिवासी भागांमध्ये जेव्हा कुणी आजारी पडतो तेव्हा त्याला सुरुवातीला होडीतून आणि नंतर विमानामधून रुग्णालयात न्यावे लागते. 9 / 9ब्राझीलमध्ये आतापर्यंत ३ लाख ६३ हजार २११ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच आतापर्यंत २२ हजार ६६६ जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications