शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह; हॉस्पिटलने पाठवलं महिला रुग्णाला २६ लाखांचे बिल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 3:02 PM

1 / 10
चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची लागण ३ लाखांहून अधिक नागरिकांना झाली आहे. आतापर्यंत ११ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
2 / 10
कोरोना व्हायरसवर औषध शोधण्यासाठी अमेरिका आणि चीन, भारत आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवलं जात आहे.
3 / 10
कोरोनाचे अमेरिकेतही अनेक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे अमेरिकेने परदेशी नागरिकांना देशात येण्यास बंदी घातली आहे.
4 / 10
दरम्यान, एका महिलेला कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या तपासणी व उपचारांसाठी रुग्णालयाकडून 26 लाख 41 हजार रुपयांचे बिल पाठविण्यात आले आहे. टाईम डॉट कॉमच्या अहवालानुसार फेब्रुवारीच्या उत्तरार्धात डॅनी एस्क्विनी नावाच्या महिलेला छातीत दुखू लागले आणि त्यानंतर ती रुग्णालयात गेली
5 / 10
एस्किनीला छातीत दुखणे, श्वास आणि मायग्रेनचा त्रास देखील होता. डॉक्टरांना औषधामुळे तिला त्रास झाल्याचं जाणवलं. यानंतर अमेरिकेच्या बोस्टनमध्ये राहणाऱ्या या महिलेला रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात ठेवण्यात आलं.
6 / 10
प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांना आढळले की एस्किनीला न्यूमोनिया आहे तिला उपचारानंतर घरी पाठवले गेले. पण काही दिवसांनंतर त्याचे तापमान वाढू लागले आणि कफ देखील सुरू झाला. दोनदा रुग्णालयात गेल्यानंतर, आजारपणाच्या सातव्या दिवशी एस्किनीची कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतर तिला घरी पाठवण्यात आलं.
7 / 10
चाचणीनंतर तीन दिवसानंतर, एस्किनीला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली. काही दिवसांनंतर 26 लाखाहून अधिकचे बिल रुग्णालयातर्फे तपासणी व उपचारांसाठी पाठविण्यात आले. एस्किनी म्हणाली- 'बिल पाहून मला आश्चर्य वाटले. ज्यांच्याकडे इतके पैसे आहेत त्यांना मी ओळखत नाही असं तिने सांगितले.
8 / 10
एस्किनीसारखे अमेरिकेतील २ कोटी ७० लाख लोकांकडे हेल्थ इन्शुरन्स नाही. अमेरिकेने कोरोना व्हायरसची तपासणी मोफत करण्याची घोषणा केली आहे. मात्र उपचारासाठी मोठी रक्कम वसूल केली जाईल अशी भीती लोकांना सतावतेय.
9 / 10
18 मार्च रोजी अमेरिकेने फॅमिली फर्स्ट कोरोना व्हायरस रिस्पॉन्स एक्ट लागू केला. त्याअंतर्गत कोरोना विषाणूची तपासणी विनामूल्य केली जाईल. तथापि, या कायद्यात उपचाराच्या खर्चाबाबत काहीही सांगितले गेले नाही.
10 / 10
भारतात संक्रमित रूग्णांची संख्या वाढून 275 झाली आहे. 6700 पेक्षा जास्त लोकांना निरीक्षणाखाली ठेवले गेले आहे. शनिवारी सकाळपर्यंत जगात संक्रमित लोकांची संख्या 3 लाखांहून जास्त आहे, तर मृतांची संख्या 11,4०० पेक्षा जास्त आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका