शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: ‘या’ प्राण्याच्या रक्तापासून बनू शकते कोरोनाची लस; वैज्ञानिकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 2:42 PM

1 / 10
प्राण्यांपासून माणसात पसरणाऱ्या कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी आता वैज्ञानिक प्राण्यांची मदत घेण्याची तयारी करत आहेत. बेल्जियमच्या काही संशोधकांनी असा दावा केला आहे की अमेरिकेत आढळलेल्या उंट प्रजाती (लामा) च्या रक्तातून कोरोना विषाणूची लस तयार केली जाऊ शकते.
2 / 10
वीलाम्स इन्स्टिट्यूट फॉर बायोटेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी असा दावा केला आहे की लामाच्या रक्तामुळे कोरोना व्हायरसचा नाश होऊ शकतो. कोविड -१९ मधील फॅमिली व्हायरस MERS आणि SARS बाबतीत लामाच्या रक्तातील अँन्टीबॉडीज देखील प्रभावी सिद्ध झाली आहे.
3 / 10
लहान अँन्टीबॉडीज असल्याने, वायरोलॉजिस्ट रक्तामध्ये असलेल्या लहान अणूंच्या मदतीने कोविड -१९च्या विरूद्ध लस किंवा औषधे बनवू शकतात. विज्ञानाच्या भाषेत याला नॅनोबॉडी तंत्रज्ञान म्हणतात.
4 / 10
तथापि, हे संशोधन एचआयव्ही संशोधनाचा एक भाग होता. संशोधकांचे म्हणणे आहे की लामाची अँन्टीबॉडी माणसांच्या अँन्टीबॉडीपेक्षा खूपच लहान असतात.
5 / 10
दक्षिण कोरियामध्ये झालेल्या आणखी एका संशोधनानुसार, कोरोना विषाणूची लस तयार करण्यासाठी मुंगूस प्रजातीचा वापर देखील केला जाऊ शकतो.
6 / 10
जर्नल सेल होस्ट अँन्ड मायक्रोब यात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कोविड -१९ चा मुंगूस प्रजातीवर होणारा परिणाम मानवाप्रमाणेच दिसून येतो. म्हणून, कोरोनाची अँटी-व्हायरस औषध तयार करण्यात त्याची बरीच मदत घेतली जाऊ शकते.
7 / 10
आतापर्यंत जगभरात २४ लाखाहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यापैकी दीड लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
8 / 10
अमेरिकेत आतापर्यंत सुमारे ४० हजार लोक या विषाणूमुळे मरण पावले आहेत. इटली, स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये सर्वाधिक लोकांनी जीव गमावला आहे.
9 / 10
भारतात कोरोना संक्रमित लोकांची संख्या आता १७ हजारांच्या वर गेली आहे, तर ५०० हून अधिक लोक मरण पावले आहेत.
10 / 10
या संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवलं आहे. केवळ संक्रमण साखळी तोडून विषाणूचा नाश होऊ शकतो असं तज्ज्ञांचे मत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या