1 / 10सध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी लस आणि औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ गेल्या सहा महिन्यांपासून आकाशपाताळ एक करत आहेत. भारतासह अनेक देशातील संशोधक कोरोनावर लस शोधण्याच्या समीप पोहोचले आहेत. 2 / 10मात्र अशा परिस्थितीत एक असं संशोधन समोर आले आहे ज्यामुळे जगभरातील संशोधकांसह अनेक देशांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूने रूप बदलले असून, त्याचे नवे रूप यूरोप आणि अमेरिकेत पसरत असल्याचे सबळ पुरावे एका जागतिक अध्ययनातून समोर आले आहेत. यासंदर्भातील वृत्त न्यूज २४ या हिंदी संकेतस्थळाने दिले आहे.3 / 10कोरोना विषाणूच्या बदललेल्या रूपामध्ये लोकांना संक्रमित करण्याची अधिक क्षमता आहे. मात्र आधीच्या बदलांच्या तुलनेत हा विषाणू फार आजारी पाडत नाही. 4 / 10 संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने याची माहिती देताना सांगितले की, आता लोकांमध्ये संसर्ग पसरवत असलेले कोरोनाचे हेच मुख्य रूप आहे. ला जोला इंस्टिट्युट फॉर इम्युनोलॉजी आणि एरोनोव्हायरस इम्युनोथेरेपी कंसोर्टियच्या एरिका ओल्मन सेफायर यांनी या संशोधनाचे काम केले आहे. यासंदर्भात जर्नल सेलमध्ये प्रकाशित झालेले संशोधन हे काही जुन्या संशोधनावर आधारित आहे. जे टीमने आधीच प्रसिद्ध केले होते. 5 / 10अनुवांशिक क्रमवारीबाबत आतपर्यंतच्या माहितीमधून कोरोना विषाणूचे एक नवे रूप समोर आल्याचे संकेत मिळत आहेत. आता संशोधकांच्या या पथकाने याबाबत अधिक अनुवांशिक क्रमवारीची तपासणी केली आहे. तसेच प्रयोगशाळेत माणूस, प्राणी आणि कोशिकांसी संबंधित प्रयोगसुद्धा केले आहेत. ज्यामधून हे बदल दिसून येत आहेत. कोरोनाचे नवे रूप अधिक सामान्य असले तरी त्याच्या इतर रूपांपेक्षा अधिक संसर्गजन्य आहे. 6 / 10विषाणू ज्या संरचनेचा उपयोग करतो तो उतींनी संक्रमित करतो. आता या विषाणूला कुठल्याही लसीच्या माध्यमातून नियंत्रित करता येईल का याचा अभ्यास संशोधक करत आहेत. सध्या चाचण्या सुरू असलेल्या लसी ह्या प्रोटिन वाढवण्याचे काम करते. मात्र या लसी कोरोना विषाणूच्या आधीच्या रूपांचे अध्ययन करून तयार करण्यात आल्या आहेत. 7 / 10जर्नल सेलमध्ये प्रकाशित झालेल्या अध्ययनानुसार कोरोना विषाणूचे नवे रूप अधिक सामान्य बनले आहे. हे नवे रूप अमेरिका आणि युरोपमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या आधीच्या रुपाला पूर्णपणे बदलत 8 / 10 संशोधकांच्या या गटाने संपूर्ण युरोप आणि अमेरिकेतील बाधितांमधून घेतलेल्या नमुन्यांचे परीक्षण केले आमि जीनोमची तपासणी केली. त्यांनी या जीनोमची तुलना करण्यासाठी सार्वजनिकपणे माहिती दिली आहे. 9 / 10तुलना केल्यानंतर कोरोनाची दोन रूपे ओळखण्यात मदत मिळाली आहे. १ मार्च २०२० च्या काळात जी६१४ हे रूप युरोपच्या बाहेर दुर्मिळ होते. मात्र मार्चच्या अखेरीस ते जगभरात फैलावले. तसेच डी६१४ हे रूप कोरोनाच्या साथीचे कारण ठरले. इंग्लंडमधील वेल्स, नॉटिंगहॅम भागात तसेच वॉशिंग्टनमध्ये जी६१४ पुन्हा दिसून आले आहे. 10 / 10संशोधकांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचे नवे रूप वेगाने वाढत आहे. ड्युक युनिव्हर्सिटीच्या डेव्हिड मोंटेफोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या विषाणूचे प्रयोगशाळेत परीक्षण केले आहे. त्यानंतर सांगितले की, कोरोना विषाणूचा जी फॉर्म हा डी फॉर्मच्या तुलनेत तीन ते नऊ पट अधिक संसर्गजन्य होता. आता आमच्याकडे संशोधनातून मिळालेले पुरावे आहेत, त्यांच्या निष्कर्षांनुसार कोरोना विषाणूचे नवे रूप त्याच्या मूळ रूपापेक्षा अधिक संक्रमणशील असल्याचे दिसून येते.