Coronavirus: Coronavirus-fighting antibodies will stay in the body for life, fight Covid-19
Coronavirus: कोरोनाशी लढणारी अँटीबॉडी आजीवन शरीरात राहणार, कोविड-१९ ला फाईट देणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 1:59 PM1 / 7कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या संपूर्ण जग त्रस्त झालेले आहे. अशा परिस्थितीत मानवजातीसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनमधील संशोधकांनी सांगितले की, कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे शरीर नेहमी कोरोनाचा सामना करू शकते. म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडी नेहमीच विकसित होत राहतील आणि या अँटीबॉडी कोरोनाशी लढत राहतील. सर्वात मोठी दिलासादायक माहिती म्हणजे कोरोनाच्या संसर्गाच्या पहिल्या लक्षणानंतर ११ महिन्यांनी पुन्हा अँटीबॉडी विकसित होत आहेत. 2 / 7अमेरिकेतील सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केलेल्या या अभ्यासाचा अहवाल २४ मे रोजी सायन्स जर्नल नेचरमध्ये प्रकाशित झाला आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोरोनाच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर काही महिन्यांनंतरही लोकांमध्ये कोरोना विषाणूशी लढण्यासाठी अँटीबॉडी सेल कार्यरत राहतात. 3 / 7कोरोना विषाणूविरोधात या अँटीबॉडी प्रतिकारशक्ती विकसित करत राहतात. दिलासादायक आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे या अँटीबॉडी आय़ुष्यभर तुमच्या शरीरात राहू शकतात. महणजेच तुमच्या शरीरामध्ये संपूर्ण जीवनभर प्रतिकार शक्ती कायम राहील. ही प्रतिकारशक्ती कोरोना विषाणूशी लढण्यास सक्षम असेल. 4 / 7वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे असोसिएट प्रोफेसर आणि या अध्ययनाचे लेखक अली एलबेडी यांनी सांगितले की, कोरोना विषाणूची पहिली लाट आली असताना म्हणजेच गतवर्षीच्या उन्हाळ्यात असे सांगण्यात आले होते की, संसर्गानंतर अँटीबॉडी ह्या फार काळ शरीरामध्ये राहत नाहीत. मात्र ही बाब खरी नाही. संसर्गानंतर अँटीबॉडी कमी होतात. रोगप्रतिकारशक्तीसुद्धा कमकुवत होते. मात्र त्या पुन्हा रिकव्हर होतात. 5 / 7एली एलबेडी यांनी संगितले की, संसर्गानंतर शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती कमी होणं ही सामान्य बाब आहे. मात्र ती संपुष्टात येत नाही. पहिल्या लक्षणानंतर ११ महिन्यांनीसुद्धा शरीरात अँटीबॉडी विकसित होत असल्याचे आम्ही तपासा पाहिले आहे. या अँटीबॉडी सेल्स आयुष्यभर लोकांना कोरोना विषाणूपासून वाचवण्यासाठी मदत करतील. त्या कधीही संपुष्टात येणार नाहीत. जेव्हा विषाणू शरीरावर हल्ला करतो तेव्हा या अँटीबॉडी सेल्स पुन्हा जागृत होतात आणि विषाणूसोबत लढतात. 6 / 7अली एलबेडी पुढे म्हणाले की, कोरोनाच्या संसर्गादरम्यान, ज्या अँटीबॉडी विकसित होतात त्या इम्युन सेल्सना विभाजित करतात. त्या हळूहळू उती आणि रक्तांमध्ये पोहोचतात. त्यामुळे अँटीबॉडीचा स्तर शरीरामध्ये वेगाने वाढतो. या अँटीबॉडी ज्या कोशिषांमुळे बनतात. त्यांना प्लाझ्मा सेल्स म्हणतात. 7 / 7प्लाझ्मा सेल्स हाडांमध्ये असलेल्या बोन मॅरो म्हणजे अस्थिमज्जेमधून जातात. मात्र त्यांचे प्रमाण कमी असू शकते. मात्र जेव्हा शरीरावर विषाणूचे आक्रमण होते तेव्हा त्या सक्रिय होतात. तसेच वेगाने विभाजित होऊन आपली संख्या वाढवतात. त्यानंतर या अँटीबॉडी सेल विषाणूशी युद्ध सुरू करतात. या अँटीबॉडी शरीराला कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचवतात. आणखी वाचा Subscribe to Notifications