coronavirus: Coronavirus now targets young population after old and sick, experts warn
coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 10:48 AM1 / 9 जगरभरात कोरोनाच्या फैलावास सुरुवात होऊ आता जवळपास पाच ते सहा महिने उलटत आले आहेत. मात्र एवढे दिवस झाल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग आणि त्याला रोखण्याच्या उपायांबाबत फारशी दिलासादायक माहिती समोर येत नाही आहे. 2 / 9सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोरोना विषाणू हा वृद्ध आणि आजारी व्यक्तींना लक्ष्य करत असल्याचे समोर आले होते. तसेच याचा तरुणांवर फारसा परिणाम होत नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता कोरोना तरुणांनाही आपली शिकार बनवत असून, अनेक केसेसमध्ये हा धोकादायक ठरत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. 3 / 9अमेरिकेतील संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फॉऊची यांनी मंगळवारी सांगितले की, डॉक्टर आणि संसर्गजन्य रोगांच्या तज्ज्ञांना कोरोना विषाणूचा संसर्स झालेल्या तरुण रुग्णांमध्ये अनेक जटिलता दिसून येत आहे. दरम्यान, हा विषाणू तरुणांसाठी धोकादायक नाही आहे आणि वृद्ध व आधीपासून इतर आजारांची शिकार असलेल्या व्यक्तींना आपले लक्ष्य करत आहे, असे अमेरिकेमध्ये जेव्हा कोरोनाचा फैलाव सुरू झाला होता तेव्हा तज्ज्ञांनी सांगितले होते. 4 / 9 हाऊस एनर्जी अँड कॉमर्स कमिटीच्या सुनावणीदरम्यान, फॉऊची यांनी सांगितले की, कोरोना विषाणू हा तरुणांसाठी धोकादायक नाही, असे समजणे चुकीचे आहे. तरुण रुग्णांमध्ये आम्हाला या विषाणूच्या संक्रमणानंतर प्रकृतीबाबत अधिक गुंतागुंत दिसून येत आहे. आम्ही आतापर्यंत एवढी वैविध्यपूर्ण लक्षणे असलेला एकही विषाणू पाहिलेला नाही, असेही त्यांनी पुढे सांगितले. 5 / 9काही लोकांमध्ये कोरोनाची काहीही लक्षणे दिसून येत नाही आहे. तर काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. काही लोकांमध्ये एवढी लक्षणे दिसतात की त्यांना काही दिवस घरी राहावे लागते. त काही लोकांना काही आठवडे अंथरुणावर काढावे लागतात. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींमध्ये नंतरही लक्षणेही दिसून येतात. काही जणांना रुग्णालयात जावे लागते, तर काही जणांना ऑक्सिजनची गरज भासते. आयसीयूमध्ये ठेवावे लागते, तर काही जणांमध्ये प्रकृती गंभीर होऊन मृत्यू ओढवतो. 6 / 9ज्या तरुणांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. ते इतरांमध्ये कोरोनाच संसर्ग फैलावू शकतात. त्यामुळे तरुणांनी स्वत:च्या तब्येतीची काळजी घेतलीच पाहिजे. सोबतच कोरोनाचा संसर्ग कसा होतोय, यावरही लक्ष ठेवले पाहिजे, असे फॉऊची यांनी सांगितले. 7 / 9जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र तुम्ही आजारी पडला नाही तरी तुमच्यापासून या आजाराचा फैलाव होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही या विषाणूचा फैलाव करणाऱ्या साखळीचा भाग बनाल. अजाणतेपणी तुम्ही इतरांना संक्रमित कराल. त्या व्यक्ती तुमच्या घरातील आजी-आजोबा किंवा आजारपण असलेले अन्य नातेवाईक असू शकतात. त्यांच्यासाठी हा आजार गंभीर ठरू शकतो, असा इशारा फॉऊची यांनी दिला. 8 / 9अमेरिकेतील काही भागांमध्ये कोरोना विषाणूच्या फैलावामध्ये चिंताजनक पातळीपर्यंत वाढ झाली आहे. मात्र न्यूयॉर्कमध्ये आता कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण घटत चालले आहे. अमेरिकेती अन्य राज्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेडचा धोका निर्माण झाला आहे, असे फॉऊची यांनी सांगितले. 9 / 9कोरोनाचा धोका असताना अनेक तरुण सोशल डिस्टंसिंगसारख्या उपायांकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच कोरोनाच्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह सापडत आहेत. फ्लोरिडा, टेक्सास राज्यांमध्ये अनेक तरुण कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत, अशी माहिती उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंच यांनी दिली आहे, त्या पार्श्वभूमीवर फॉऊची यांनी हे विधान केले आहे, आणखी वाचा Subscribe to Notifications