शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोठा खुलासा! चीनच्या वुहान लॅबमध्येच कोरोनाची निर्मिती; शास्त्रज्ञांना मिळाले फिंगरप्रिंट?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 1:31 PM

1 / 11
चीनच्या वुहान इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये (Wuhan Institute of Virology) कोरोना व्हायरस तयार करण्यात आला आहे. याबाबतचा एक नवा अभ्यास समोर आला आहे. यात खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
2 / 11
चीनच्या वैज्ञानिकांनी व्हायरस तयार केल्यानंतर त्याला रिव्हर्स-इंजिनिअरिंग व्हर्जनपासून बदलण्याचा प्रयत्न केला की जेणेकरुन लोकांना असं वाटावं की या व्हायरसची निर्मिती वटवाघळांपासून झाली आहे, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
3 / 11
दरम्यान, या अहवालानंतर आता पुन्हा एकदा चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच व्हायरसचा प्रसार झाल्याच्या बातम्या पुढे येऊ लागल्या आहेत. अमेरिका आणि ब्रिटननं याप्रकरणाच्या तपासासाठी जागतिक आरोग्य संघटनेवर (WHO) दबाव निर्माण केला आहे.
4 / 11
'डेली मेल'च्या वृत्तानुसार चीनबाबत खळबळजनक खुलासा करणारा हा अहवाल ब्रिटिश प्रोफेसर एंग्स डल्गलिश (Angus Dalgleish) आणि नॉर्वेचे वैज्ञानिक डॉ, बिर्गर सोरेनसन (Dr. Birger Sørensen) यांनी तयार केला आहे. चीनमध्ये एका वर्षाहून अधिक काळापासून व्हायरसच्या रेट्रो-इंजिनिअरिंगवर काम सुरू असल्याचे सबळ पुरावे त्यांच्या हाती आहेत.
5 / 11
प्रोफेसर डल्गलिश लंडनमध्ये सेंट जॉर्ज यूनिवर्सिटीमध्ये कर्करोग विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. तर डॉ. सोरेनसन एक वायरोलॉजिस्ट आहेत आणि Immunor नामक कंपनीचे ते अध्यक्ष आहेत. ही कंपनी कोरोना विरोधी लस तयार करत आहे.
6 / 11
वुहानच्या प्रयोगशाळेतून (Wuhan Lab) जाणूनबुजून कोरोना संदर्भातील डेटा नष्ट करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. महत्वाची माहिती लपविण्याचा आणि ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर ज्या वैज्ञानिकांनी याबाबत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला त्यांना गायब करण्यात आलं आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
7 / 11
डल्गलिश आणि सोरेनसन लस तयार करण्यासाठी कोरोना विषाणूच्या सँपलचा अभ्यास करत होते. तेव्हा त्यांना व्हायरसमध्ये एक ‘खास फिंगरप्रिंट’ मिळालं आहे. त्याचवरुन या व्हायरसवर प्रयोगशाळेत बदल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे याचा पुरावा मिळतो.
8 / 11
जेव्हा या दोन्ही वैज्ञानिकांनी ही माहिती छापण्याचा निर्धार केला तेव्हा त्यांना एका सायन्स जर्नलनं नकार दिला, असंही दोघांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी असं सांगण्यात आलं होतं की या व्हायरसचं संक्रमण वटवाघळांकडून माणसामध्ये पोहोचलं आहे.
9 / 11
पण आता एका वर्षानंतर अनेक देशांचे राजकीय नेते, अभ्यास, अहवाल आणि माध्यमांनी आपली भूमिका बदलली आहे. आता सर्वांना विश्वास बसणं सुरू झालं आहे की या व्हायरसची निर्मिती वुहान प्रयोगशाळेतूनच करण्यात आली आहे.
10 / 11
वुहानच्या प्रयोगशाळेत वटवाघळांवर कोरोना व्हायरचा काय प्रभाव होतो याची चाचणी सुरू होती असं सांगण्यात येतं. त्यानंतर याचा माणसावर कोणता परिणाम होऊ शकतो याचाही अभ्यास तिथे सुरू होता, असाही दावा करण्यात आला आहे.
11 / 11
दरम्यान, याच आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनीही देशाच्या गुप्तचर यंत्रणांना कोरोना व्हायरसचे मूळ शोधण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात चीनसमोरील संकटं वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनCorona vaccineकोरोनाची लसUSअमेरिका