Coronavirus : 18 सप्टेंबर 2019 दिवशी चीनच्या वुहानमधे काय झालं होतं? हैराण करणारा खुलासा... By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 3:36 PM
1 / 10 चीनमधून कोरोना व्हायरस जगभरात पसरला आणि चीनबाबत एकापाठी एक वेगवेगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या. तसेच चीनने कोरोनाबाबतची महत्वाची माहितीही लपवल्याचाही आरोप आहे. अशात चीनमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती आहे 18 सप्टेंबर 2019 या दिवसाची. 2 / 10 या दिवशी दुपारी वुहानच्या तिआन्हे एअरपोर्टच्या कस्मट ऑफिसमध्ये एक इमरजन्सी आला होता. मेसेजमधे सांगण्यात आलं की, लॅंड करणाऱ्या फ्लाइटमधे एक प्रवाशी आजारी आहे आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यानंतर एअरपोर्ट स्टाफ इमरजन्सी मोडमधे आला. (सांकेतिक छायाचित्र) (साभार - AFP) 3 / 10 डेली मेलच्या रिपोर्टनुसार, 18 सप्टेंबरला इमरजन्सी मेसेज मिळाल्यानंतर वुहान येथील एअरपोर्टमधील मॅनेजरने स्टाफ इमरजन्सी ड्रिलची प्रक्रिया समजावून सांगितली. नंतर स्टाफ प्रोटेक्टिव मास्क लावून आवश्यक ती कारवाई करू लागले. (Image Credit : AFP) 4 / 10 चीनच्या स्टेट मीडियाच्या एक पत्रकारानुसार, त्यानंतर काही दिवसांनी वुहानच्या प्राथमिक सहायता केंद्राने माहिती दिली की, टेस्टमधे संबंधित रूग्णाला नोवल कोरोना व्हायरसची लागण असल्याचं समोर आले आहे. पण चीनच्या मीडियाने संपूर्ण घटनेला एक ड्रिल दर्शवलं. 5 / 10 त्यावेळी चीनी मीडियाने सांगितले होते की, वर्ल्ड मिलिट्री गेम्सच्या आयोजनाबाबत इमरजन्सी रिस्पॉन्स तपासणी करण्यासाठी कोरोना व्हायरसची ड्रिल करण्यात आली. पुढील महिन्यात चीनमधे होणाऱ्या वर्ल्ड मिलिट्री गेम्समध्ये 10 हजार लोक सहभाग घेणार होते. अधिकाऱ्यांनी ड्रिल यशस्वी झाल्याचं सांगण्यात आलं होतं. (सांकेतिक छायाचित्र - AFP) 6 / 10 पण आता इंटरनॅशनल मीडियात आता प्रश्न उपस्थित होत आहे की, चीनने हाच अभ्यास म्हणजे ड्रिलची निवड का केली? सोशल मीडियातील लोकही हाच प्रश्न विचारत आहेत की, त्यांनी नवीन कोरोना व्हायरसबाबत ड्रिल का केलं? 7 / 10 दरम्यान, गेल्याच आठवड्यात एका फ्रेंच खेळाडूने सांगितले होते की, त्याला वाटतं की, वर्ल्ड मिलिट्री गेम्सदरम्यान अनेक लोक कोविड-19 ने संक्रमित झाले होते. 8 / 10 वर्ल्ड चॅम्पियन पेंटाथलीट इलोडी क्लाउवेल म्हणाला की, 'मिलिट्री गेम्स दरम्यान अनेक खेळाडू एकाएकी आजारी पडले होते'. 18 ऑक्टोबर 2019 ला सुरू झालेले वर्ल्ड मिलिट्री गेम्स 9 दिवस सुरू होते. (Image Credit : Daily Mail) 9 / 10 अशात काही दिवसांपूर्वीच एक माहिती समोर आली होती की, पॅरिसच्या एका हॉस्पिटलमध्ये 27 डिसेंबरलाच एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. मासे विकणाऱ्या या व्यक्तीला तेव्हा न्यूमोनियाचं संशयित सजण्यात आले होते. 10 / 10 हॉस्पिटलमधील त्याच्या सॅम्पलची जेव्हा डॉक्टरांनी कोरोनासाठी तपासणी केली तेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ही व्यक्ती परदेशात कुठेही गेली नव्हती. (प्रातिनिधीक छायाचित्र) आणखी वाचा