coronavirus: Does coronavirus spread through children? Information that emerged from the study
coronavirus: लहान मुलांच्या माध्यमातून कोरोना पसरतो की नाही? अभ्यासातून समोर आली अशी माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 3:18 PM1 / 6कोरोना विषाणूच्या वेगाने होत असलेल्या संसर्गामुळे सध्या संपूर्ण जग चिंतीत आहे. काही ठिकाणी कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. तर काही ठिकाणी कोरोनाचा फैलाव मर्यादित आहे. 2 / 6दरम्यान, कोरोनाचा संसर्ग सुरू असला तरी ब्रिटन आणि अमेरिका यासारख्या देशांमध्ये शाळा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. शाळा सुरू करण्यासाठी लहान मुलांच्या माध्यमातून कोरोना कमी प्रमाणात पसरतो असा तर्क देण्यात आला आहे. 3 / 6मात्र शाळा सुरू करण्यासाठी लहान मुलांच्या माध्यमातून कोरोना कमी प्रमाणात पसरत असल्याचा तर्क देण्यात आला असला तरी संशोधनातून जी माहिती समोर आली आहे ती शाळा लवकर सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्यांची चिंता वाढवणारी आहे. 4 / 6दक्षिण कोरियामध्ये ६५ हजार लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासामधून शाळा सुरू केल्याने कोरोनाचे रुग्ण वाढणार असल्याचे समोर आले आहे. १० वर्षांखालील मुले प्रौढांच्या तुलनेत कोरोनाचा कमी प्रमाणात प्रसार करत असले तरी फैलावाचा धोका शून्यावर येत नसल्याचे संशोधनातून समोर आले आहे. 5 / 6 हॉवर्ड ग्लोबल हेल्थ इंस्टिट्युटचे संचालक डॉ. आशीष झा यांनी सांगितले की, आशिया आणि युरोपमधील संशोधनामधून असे संकेत मिळत होते की मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. तसेच त्यांच्यामाध्यमातून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यताही कमी आहे. मात्र या संशोधनाची व्याप्ती फार लहान होती. तसेच त्यात अनेक त्रुटीही होत्या. मात्र आता नव्याने करण्यात आलेले संशोधन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून, त्याची व्याप्तीही मोठी आहे. 6 / 6१० वर्षांखालील मुलांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण हे प्रौढांपेक्षा निम्मे आहे, असे या नव्या संशोधनामधून समोर आले आहे. लहान मुले श्वसनादरम्यान कमी हवा बाहेर सोडतात. तसेच त्यांची उंची देखील कमी असते. त्यामुळे कम संसर्गाचा फैलाव होतो, असा दावा या संशोधनामधून करण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications