Coronavirus: Dutch government ordered to kill 10000 mink after two people found corona positive
Coronavirus: ‘या’ प्राण्यापासून लोकांना कोरोनाची लागण; १० हजार प्राणी मारण्याचे सरकारचे आदेश By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 1:35 PM1 / 11जगात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता नेदरलँड सरकारने दहा हजार मिंक जनावरे मारण्याचा आदेश दिला आहे.2 / 11कोरोना विषाणूने संक्रमित हे प्राणी मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतात अशी भीती सरकारला वाटत आहे. अलीकडेच नेदरलँडमधील १० शेतात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले मिंक प्राणी आढळले. 3 / 11मुंगूस सदृश दिसणारा हा प्राणी ३-५० सेमी लांबीचा आहे. एक मिंकचे वजन सुमारे २ किलो असते. मिंक त्याच्या फरसाठी येथे पाळले जाते.4 / 11देशाच्या अन्न प्राधिकरणाचे प्रवक्ते फ्रेडरिक हर्मी म्हणाले की, ज्याठिकाणी एक जरी संसर्गाचे प्रकरण आढळले आहेत तेथील सर्व मिंक ब्रीडिंग फार्म पूर्णपणे साफ केले जातील 5 / 11संसर्ग नसलेल्या शेतात काम चालू राहील. १०,००० मिंकच्या हत्येचे आदेश देताना सरकारने कोरोना विषाणू-संक्रमणामुळे त्याचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. 6 / 11एप्रिल महिन्यात, ब्रीडिंगच्या अनेक शेतातल्या मिंकला त्यांच्या मालकांपासून कोरोना विषाणूची लागण केली होती. मे महिन्यात या जनावरामुळे संक्रमित झालेले दोन रुग्ण आढळले. 7 / 11त्यानंतर मिंक वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. चीनमधील कोरोना विषाणूचा जागतिक उद्रेक झाल्यापासून प्राण्यांपासून मनुष्यांपर्यंत कोरोना विषाणूची ही पहिली घटना आहे.8 / 11शासकीय आदेशानुसार संरक्षक कपडे घातलेले शेतमजूर मिंकवर गॅस फवारतील. यानंतर त्यांचे मृतदेह विल्हेवाट करण्यासाठी पाठवले जातील. 9 / 11यानंतर फार्म पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनलचे कार्यकारी संचालक क्लेयर बाईस यांनी जगातील २४ देशांना आवाहन केले आहे. 10 / 11 जे देश अजूनही मिंकची शेती करत आहेत. त्यांनी नेदरलँड्सच्या सल्ल्यानुसार पुढची कार्यवाही करावी असं ते म्हणाले आहेत. चीन, डेन्मार्क आणि पोलंड हे सर्वात मोठे मिंक उत्पादक आहेत, जिथे प्रत्येक वर्षासाठी ६ कोटी मिंक मारले जातात. 11 / 11डच फेडरेशन ऑफ पेल्ट फार्मर्सच्या मते, नेदरलँड्समध्ये १४० मिंक फार्म आहेत, जे दरवर्षी 90 मिलियन युरो निर्यात करतात. फेडरेशनचे प्रवक्ते विम व्हर्गेन म्हणाले की, काही संक्रमित प्राणी या आजाराची चिन्हे दर्शवित आहेत हे शेतकऱ्यांना मान्य करणे फार कठीण आहे. सरकार बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications