शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: कोरोनावर ‘हे’ औषध अत्यंत प्रभावी असल्याचं सिद्ध; अनेक रुग्ण बरे झाल्याचं चित्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 10:14 AM

1 / 11
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशातील लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या जगभरातील ६५ लाखांहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर साडेतीन लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
2 / 11
कोरोनावर लस शोधण्यासाठी अनेक वैज्ञानिक संशोधन करत आहे. यात कोरोना व्हायरस लशीबद्दल एक चांगली बातमी आहे. इबोला निर्मूलनासाठी बनवलेले एक औषध कोरोना विषाणूच्या रूग्णांना बरे करत असल्याचं आढळून आलं आहे. जीलीड्स सांइसेज इनकॉर्पोरेशनच्या रेमडेसिविर औषधाने कोरोनाचे गंभीर रुग्ण वगळता इतर रुग्ण बरे होत आहेत.
3 / 11
कोरोनाच्या रूग्णांवर औषध तपासण्यासाठी कंपनीने ६०० रूग्णांवर दोन प्रकारचे उपचार केले. काही लोकांना औषध ५ दिवस दिले गेले. काही रुग्णांना १० दिवसांचा औषधोपचार देण्यात आला. त्या रुग्णांबरोबरच मानक औषधी प्रक्रियेद्वारे उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही ठेवले होते.
4 / 11
अकराव्या दिवशी असं आढळून आले की, पाच दिवसांचे उपचार असलेले रूग्ण सामान्य पद्धतीने उपचार घेणाऱ्या रूग्णांपेक्षा तुलनेने लवकर बरे होत आहेत. तसेच, ज्या गंभीर रुग्णांना १० दिवस औषध दिले गेले होते त्यांच्यातही बरीच सुधारणा दिसली आहे.
5 / 11
अगदी महिनाभरापूर्वीच, अमेरिकन शास्त्रज्ञांनी सांगितले की, या औषधाच्या यशामुळे आम्हाला कोरोनाचा पराभव करण्याची नवी आशा मिळाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार डॉ एँथोनी फॉसी यांनीही या औषधाचे कौतुक केले आहे
6 / 11
या औषधामुळे कोरोनाचे रुग्ण ३१ टक्के वेगाने बरे होत आहेत. डॉ एँथोनी फॉसी म्हणाले की, ते खरोखर प्रभावी औषध आहे. यामुळे रूग्णांचे लवकरात लवकर बरे होण्याचा अर्थ आपण हे औषध अधिकाधिक वापरु शकतो. डॉ. फॉसी यांनी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर माध्यमांना हे सांगितले.
7 / 11
अमेरिकेने एप्रिल महिन्यात या औषधाची क्लिनिकल चाचणी सुरू केली. ज्याचे निकाल आता समोर आले आहेत. डॉ. फॉसी म्हणाले की, आकडेवारीवरून रुग्णांच्या बरे होण्याचा परिणाम रेमडेसिविर औषधामुळे अधिक स्पष्ट होतो.
8 / 11
डॉ. एँथोनी फॉसी म्हणाले की, अमेरिका, युरोप आणि आशियातील ६८ ठिकाणी १०६३ लोकांवर औषधोपचार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ज्यामध्ये असे नोंदवले गेले आहे की हे औषध कोरोना रूग्णांना लवकर बरे करू शकते. तसेच व्हायरसचा संसर्ग कमी करता येईल.
9 / 11
रेमडेसिविर इबोला चाचणीत अयशस्वी झाली होती. यापूर्वी, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की कोरोना रूग्णांवर या औषधाचा परिणाम कमी होत आहे. ते प्रभावी नाही. परंतु आता या क्लिनिकल चाचणीनंतर डब्ल्यूएचओचे वरिष्ठ अधिकारी मायकेल रायन भाष्य करण्यास नकार दिला आहे.
10 / 11
इबोलाची लस म्हणून रेमडेसिविर औषध तयार केले होते. यामुळे कोणत्याही प्रकारचे विषाणू ठार होऊ शकतात. यापूर्वी, अमेरिकेतील शिकागो शहरात गंभीर स्वरुपाच्या आजारी असलेल्या १२५ रुग्णांना रेमडेसिविर देण्यात आले होते, त्यापैकी १२३ रुग्ण बरे झाले.
11 / 11
कोरोना विषाणूविरूद्ध सर्वात प्रभावी औषध म्हणून रेमडेसिविर मानले गेले, जेव्हा चीनमध्ये प्रथमच मनुष्यांमध्ये पसरण्याची पुष्टी झाली तेव्हाच त्याने पेटंट करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा डाव फसला होता
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका