coronavirus: homeless people face many problem due to corona virus BKP
coronavirus : कोरोनामुळे बेघरांची ससेहोलपट; कुठे अन्नासाठी हाल, तर कुठे आरोग्याची अबाळ By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 7:39 PM1 / 8कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या संपूर्ण जग संकटात सापडले आहे. भारतात कोरोनाच्या फैलावाने वेग घेतला असला तरी भारतात कोरोना नियंत्रणात आहे. पण कोरोनामुळे भारतासह जगभरातील बेघर लोकांची मोठ्या प्रमाणात फरफट होत आहे.2 / 8लंडन (इंग्लंड) - इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनामुळे लंडनमधील बेघरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे लोक राहण्यासाठी मेट्रो स्टेशन आणि रस्त्यांच्या कडेचा आधार घेत आहेत.3 / 8डकार (सेनेगल) - सेनेगलमध्ये कोरोनामुळे 4 मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे येथील बेघरांना सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बेंचवर रात्र काढावी लागत आहे.4 / 8फ्लोरिडा (अमेरिका) - अमेरिकेसारख्या देशातही हजारो बेघर नागरिक आहेत. येथे किमान आरोग्य कर्मचारी या बेघरांची तपासणी करण्यासाठी नियमितपणे जातात.5 / 8भारत - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भारतातील बेघर आणि गरिबांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सरकारने काही लोकांची व्यवस्था केली आहे. मात्र काही लोकांची फरफट होत आहे.6 / 8बँकॉक (थायलंड) - थायलंडमध्ये सध्या बेघरांना मदत केंद्रात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.7 / 8लास वेगास (अमेरिका) - मौजमजेसाठी प्रसिद्ध असलेल्या लास वेगासमध्ये सध्या बेघर लोक पार्किंगच्या जागेवर राहत आहेत.8 / 8रोम (इटली) - इटलीमध्ये कोरोना विषाणूने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. येथे श्रीमंतांसोबत बेघर लोकांनाही कोरोनाचा सामना करावा लागत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications