coronavirus : How chinese connection affected Italy badly api
coronavirus : ...म्हणून चीननंतर कोरोनाचा सर्वात जास्त फटका इटलीला बसला, मृतांची संख्या चीनच्या पुढे! By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 11:44 AM1 / 11कोरोना व्हायरसने इटलीमध्ये मरणाऱ्यांची संख्या चीनच्या पुढे गेली आहे. आता इटलीमध्ये 3,405 इतका मृतांचा आकडा झाला आहे. मात्र, चीनपासून इटली लांब असतानाही कोरोनाची लागण इतक्या जास्त लोकांना कशी झाली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 2 / 11आशियामध्ये चीन तर यूरोपमध्ये कोरोना व्हायरसने सर्वात जास्त लोक प्रभावित झाले आहेत. कोरोना तसा जगभरात पसरला पण इटलीमध्ये त्याने सर्वात जास्त थैमान घातलं आहे. यानंतर चीन आणि इटलीचं काय कनेक्शन आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो आहे. चला जाणून घेऊ यांचं कारण...3 / 11इटलीचा उत्तर भाग हा फॅशन आणि गारमेंट इंडस्ट्रीमुळे वाढत आहे. जगभप्रसिद्ध गुची आणि प्राडा ब्रॅन्डचं बेसही इथेच आहे. चीन जगभरात सर्वात स्वस्त मॅन्युक्चरिंग उपलब्ध करून देतं. त्यामुळे इटलीतील जास्तीत जास्त ब्रॅन्ड चीनसोबत मिळून काम करता. 4 / 11इटलीच्या या फॅशन हाऊसेसमध्ये कमी पैशात काम करणाऱ्या चीनी कामगारांना हायर करण्यात आलं आहे. ज्यात जास्तीत जास्त चीनच्या वुहान येथील लोक आहेत.5 / 11आणखी एक महत्वाची बाब म्हणजे इटली ते वुहान थेट फ्लाइटची सेवा आहे आणि इटलीतील फॅक्टरींमध्ये एका लाखांपेक्षा जास्त चीनचे नागरीक काम करतात. चीनच्या नागरीकांनी हळूहळू इटलीमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. येथील अनेक फॅशन कंपन्यांचे मालकही चीनी लोक आहेत.6 / 11तेच एका दुसऱ्या रिपोर्टनुसार, इथे 3 लाख चीनी लोक राहतात आणि त्यातील 90 टक्के लोक इटलीतील गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करतात. रिपोर्टनुसार, या हजारो छोट्या कंपनी निर्यातीचं काम करतात. त्यामुळे चीन आणि इटली जुळलेले आहेत.7 / 11हे सगळं माहीत असूनही इटलीतील प्रशासन झोपेतून उशीरा जागं झालं. तोपर्यंत कोरोना व्हायरसने अनेकांना आपल्या जाळ्यात घेतलं होतं. 8 / 11आता तर इथे मरणाऱ्यांची संख्या 3,405 झाली आहे. हा आकडा चीनमध्ये 3,245 इतका होता.9 / 11तज्ज्ञांचं असं मत आहे की नोवेल कोरोना व्हायरसने इटलीवर दोनप्रकारे हल्ला केला. एक म्हणजे इथे मृतांची संख्या जास्त आहे. 10 / 11साधारण 60 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या 40 किंवा त्यापेक्षा जास्त वयाची आहे. ज्यातील 23 टक्के लोकसंख्या 65 वयापेक्षा जास्त आहे.11 / 11त्यामुळे इटलीची एक चतुर्थांश लोकसंख्या धोक्यात आहे. दुसरं कारण अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. या देशातील 100 अरब डॉलरची फॅशन इंडस्ट्री प्रभावित होणार आहे. कारण यासाठी ते जास्तीत जास्त चीनवर अवलंबून आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications