Coronavirus : the huge disease comes to the world in Every 100 years BKP
दर १०० वर्षांनी जगात येते रोगाची मोठी साथ, ४०० वर्षांत ४ मोठ्या साथींनी घेतले लाखो बळी By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 4:04 PM1 / 12सध्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चीनमधून सुरू झालेला कोरोना विषाणूचा प्रसार आतापर्यंत भारतासह १०० हून अधिक देशात झाला आहेत. त्याने हजारो लोकांचा बळी घेतला आहे. तर लाखो जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 2 / 12दरम्यान, मानवी इतिहासातील गेल्या काही दशकांवर नजर टाकल्यास दर शंभर वर्षांनी जगात रोगाची एखादी मोठी साथ येत असल्याचे दिसून येते. गेल्या ४०० वर्षांत अशा चार मोठ्या साथींनी जगभरातील लाखो लोकांचा बळी घेतला आहे. जाणून घेऊया जगात आलापर्यंत आलेल्या रोगाच्या मोठ्या साथींविषयी. 3 / 12१७२० मध्ये जगात प्लेगची मोठी साथ आली होती. या साथीला द ग्रेट प्लेग ऑफ मार्सिले या नावाने ओळखले जाते. मार्सिले हे फ्रान्समधील एक शहर आहे. प्लेगच्या या साथीमुळे मार्सिले शहरात सुमारे एक लाख लोकांचा मृत्यू झाला होता.4 / 12प्लेग पसरल्यावर मार्सिले शहरात काही महिन्यातच ५० हजार लोक मृत्युमुखी पडले. तर पुढच्या दोन वर्षांत ५० हजार लोकांचा मृत्यू झाला. 5 / 12या वर्षी आशिया खंडामध्ये कॉलराची भयानक साथ आली होती. काही दिवसांतच या साथीने महामारीचे रूप घेतले. 6 / 12जपान, फारसच्या आखातातील देश, भारत, मनिला, जावा, बँकॉक, चीन, ओमान, मॉरिशच, सीरिया आदि देशात ही साथ मोठ्या प्रमाणावर पसरली7 / 12कॉलराच्या या साथीमुळे जावा बेटांवर एक लाख लोकांचा मृत्यू झाला. थायलंड, इंडोनेशिया, फिलिपिन्समध्ये कॉलराच्या या साथीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. 8 / 12१९२० च्या सुमारास जगभरात स्पॅनिश फ्लूची साथ पसरली. ही साथ १९१८ पासूनच पसरण्यास सुरुवात झाली होती. मात्र तिचा प्रभाव १९२० मध्ये दिसून आला. 9 / 12स्पॅनिश फ्लूच्या साथीमुळे जगभरात सुमारे १ कोटी ७० लाख ते ५ कोटी लोक मारले गेल्याचे सांगण्यात येते. 10 / 12आता २०२० मध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून, कोरोना विषाणूचा प्रसार चीनमधून सुरू झाला आहे. 11 / 12कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाखांहून अधिक जणांना त्याची बाधा झाली आहे. 12 / 12भारतातही कोरोनाचे ७० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications