Coronavirus: Huge study supporting ivermectin as Covid treatment withdrawn over ethical concerns
Coronavirus: कोरोना उपचारांवर शंका बळावली; ‘Ivermectin’ औषधावरील सर्वात मोठा स्टडी रिपोर्ट चुकीचा ठरला By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 3:17 PM1 / 12कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आयवरमेक्टिन(Ivermectin) हे औषध सर्वात प्रभावी ठरत आहे. कोविड १९ च्या उपचारांमध्ये या औषधाच्या समर्थनार्थ एका मोठ्या वैज्ञानिकांनी संशोधन केले होते. या औषधाच्या क्षमतेचा आढावा घेतला होता. औषधं कामही करत होतं. या औषधाच्या वापरामुळे बरेच लोक बरेही झाले. परंतु वैज्ञानिकांच्या या रिसर्च रिपोर्टला साइंटिफिर रिव्यू वेबसाईटवरुन हटवण्यात आलं आहे. आयवरमेक्टिनचं समर्थन करणाऱ्या वैज्ञानिकावर नैतिकतेचे नियम भंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर वैज्ञानिकांच्या दोन गटात वाद निर्माण झाला आहे. 2 / 12आयवरमेक्टिन औषधाचं समर्थन डाव्या विचारधारेचे लोक करत आहेत असा आरोप केला गेला आहे. मिस्त्रच्या बेन्हा यूनिवर्सिटीचे प्रा. अहमद एल्गाजार यांनी आयवरमेक्टिनवर रिसर्च केला आहे. त्यांनी रिसर्च रिपोर्ट मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये रिसर्च स्क्वायर वेबसाईटवर प्रकाशित केला होता. ज्यात हा दावा केला होता की, पैरासाइट सारख्या कीडे आणि केसातील वुआ मारण्यासाठी हे औषधं कामी येते. परंतु कोरोनाविरुद्ध प्रभावी क्षमता आणि सुरक्षित आहे. 3 / 12डॉ. अहमद एल्गाजार बेन्हा मेडिकल जर्नलचे चीफ एडिटर आहेत. त्याचसोबत एडिटोरियल बोर्ड मेंबर आहेत. काही वैज्ञानिकांच्या मते, डॉक्टर अहमद यांनी आयवरमेक्टिनच्या समर्थनासाठी लोकांना प्रोत्साहित केले. त्यांनी जो रिपोर्ट बनवला आहे तो नैतिकतेच्या आधारे योग्य नाही. या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की, ज्या लोकांनी कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या दिवसात आयवरमेक्टिन औषध घेतलं. त्यांना जास्त फायदा झाला. ते रुग्णालयात गेले नाहीत. तर रुग्णालयात दाखल असलेल्यांना मृत्यूपासून वाचवू शकलो. 4 / 12डॉ. अहमद यांचा स्टडी रिपोर्ट गुरुवारी १५ जुलैला रिसर्च स्क्वायर वेबसाईटवरून हटवण्यात आला. त्यानंतर जगभरात आयवरमेक्टिन औषध कोरोनाच्या उपचारासाठी योग्य आहे की नाही याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. रिसर्च स्क्वायरने हा रिपोर्ट हटवण्यामागे नेमकं काय कारण आहे हे स्पष्ट केले नाही. लंडनमधील एक मेडिकल स्टूड्येंट जॅक लॉरेंस याला सर्वात पहिलं डॉ. अहमद यांच्या स्टडी रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड असल्याचं आढळलं.5 / 12जॅक पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे. एका लेक्चररने असाइनमेंटसाठी डॉ. अहमद यांचा स्टडी रिपोर्ट त्याला वाचायला सांगितला. डॉ. अहमद यांच्या रिसर्च स्टडीचा इंट्रोडक्शनचा भाग पूर्णपणे कॉपी केल्याचं त्याला आढळलं. डॉ. अहमद यांनी आयवरमेक्टिनबाबत एका प्रेस रिलीजमधील पॅरा तिथे छापला होता. त्यातील काही किवर्ड बदलले होते. एका जागी सिवियर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम याला चुकून एक्सट्रीम इंटेंस रेस्पिरेटरी सिंड्रोम लिहिलं होतं. जे पूर्णत: चुकीचं आणि विनोदी होतं. 6 / 12जॅकने जेव्हा गांभीर्याने आणखी तपास केला असता डॉ. अहमद यांच्या स्टडी रिपोर्टमध्ये गडबड आढळली. यात जो डेटा दिला होता तो स्टडी प्रोटोकॉलच्या नियमांचं उल्लंघन करणारा दिसून आला. डॉ. अहमद एल्गाजार यांनी दावा केला होता की, त्यांनी स्टडीमध्ये १८ ते ८० वयोगटातील लोकांचा समावेश केला होता. परंतु जॅकने त्यातील ३ रुग्णांचा उल्लेख केला ज्यांचे वय १८ वर्षापेक्षा कमी होतं. 7 / 12तसेच ८ जून ते २० सप्टेंबर २०२० दरम्यान डॉ. अहमद यांनी स्टडी करण्याचा दावा केला होता. परंतु डेटानुसार सर्वाधिक रुग्ण जे हॉस्पिटलमध्ये दाखल होते आणि त्यांचा ८ जून पूर्वीच मृत्यू झाला होता. डेटा चुकीच्या पद्धतीने फॉरमॅट केला होता. एका रुग्णाची हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होण्याची तारीख तर अशी लिहिली होती की ती कॅलेंडरमध्ये पण नाही. ही तारीख होती ३१ जून २०२०8 / 12डॉ. अहमद यांच्या स्टडी रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की, १०० रुग्णांपैकी ४ रुग्णांचा मृत्यू स्टँडर्ड ट्रिटमेंटमुळे झाला आहे. हे रुग्ण कोरोनाच्या सौम्य आणि मध्यम संक्रमणाने पीडित होते. तर जॅकने सांगितले की, ओरिजिनल डेटा झिरो आहे. तोच झिरो डेटा आयवरमेक्टिनच्या वापरासह दाखवला गेला आहे. ज्या गंभीर रुग्णांवर आयवरमेक्टिन वापरण्यात आलं त्यातील दोघांचा मृत्यू झाला. तर रॉ डेटामध्ये ही संख्या ४ दाखवते. 9 / 12जॅक लाँरेंस आणि द गार्जियन वृत्तपत्राने डॉ. अहमद एल्गाजार यांना या प्रश्नांची यादी ईमेल केली. परंतु डॉ. अहमद यांच्याकडून काहीही उत्तर आलं नाही. त्यांच्या यूनिवर्सिटीच्या प्रेस ऑफिसकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जॅक लाँरेंसने ऑस्ट्रेलियन क्रोनिक डिजीस एपिडेमियोलॉजिस्ट जिडियोन मिरोविट्ज काट्ज आणि स्वीडन येथील लिनियस यूनिवर्सिटीचे डेटा एनालिस्ट निक ब्राउन यांच्याशी संपर्क साधला कारण डॉ. अहमद यांच्या रिसर्च स्टडीच्या डेटाचा तपास करता येऊ शकेल.10 / 12जिडियोन आणि निक ब्राउनने आयवरमेक्टिनवर डॉ. अहमद एल्गाजार यांच्या रिसर्चमधील बहुतांश चुका शोधून काढल्या. त्यांची एक यादी केली. त्यात स्पष्टपणे दिसतंय वैज्ञानिकाने रुग्णांचा डेटा रिपीट केला आहे. ७९ रुग्णांचा डेटा क्लोन केला आहे. निक ब्राऊनच्या मते, डॉ. अहमद यांनी जाणुनबुजून या चुका केल्या आहेत. डेटासोबत अनेक फेरफार करण्यात आले आहेत. 11 / 12डॉ. अहमद एल्गाजार यांच्या आयवरमेक्टिन स्टडी रिपोर्टच्या आधारे जगभरात कोरोनाच्या उपचारासाठी या औषधाचा वापर होऊ लागला. परंतु आता त्यांच्या स्टडी रिपोर्टमध्ये चुका आढळल्याने वैज्ञानिकांनी या औषधाच्या वापरावर संशय घेतला आहे. कारण डॉ. अहमद यांची स्टडी आयवरमेक्टिनवरील सर्वात मोठी स्टडी होती जी आता चुकीचं असल्याचं सिद्ध झालं आहे. 12 / 12यापूर्वी सिडनीच्या एका डॉक्टरने आयवरमेक्टिनच्या विविध स्टडी रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यात डॉ. अहमद यांच्या स्टडी रिपोर्टचाही समावेश होता. परंतु त्यावेळी डॉ. काइल शेल्ड्रिक यांचे म्हणणं कोणी ऐकलं नाही. आयवरमेक्टिनची मागणी अमेरिका आणि भारतामुळे वाढली. कारण सुरुवातीच्या काळात या औषधाचा वापर याठिकाणी झाला. आताही सुरू आहे. परंतु मार्चमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने क्लिनिकल ट्रायल्सनंतर या औषधाचा वापर करण्यास बंदी घातली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications