जर अमेरिकेने रोखलं नसतं तर 4 वर्षाआधीच कोरोनावर औषध तयार झालं असतं, वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा! By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 2:29 PM
1 / 11 कोरोना व्हायरसने आतापर्यंत जगभरातील 19 लाखांपेक्षा जास्त लोकांना शिकार केलं आहे. यातील 1 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अशात जगातल्या प्रत्येकाला हाच प्रश्न पडला आहे की, यावरील वॅक्सीन किंवा औषध कधीपर्यंत तयार होईल. 2 / 11 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ते जगभरातील तज्ज्ञांनी अजून याबाबत काहीही ठामपणे सांगितलं नाही. अनेकांनी त्यांनी औषध शोधल्याचा दावाही केला जात आहे, पण त्यावर काहीही शिक्कामोर्तब झालेलं नाही. अशात आता अमेरिकेतील ह्यूस्टनमधील बेलर कॉलेज ऑफ मेडिसिन (Baylor College of Medicine) च्या नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनने दावा केला आहे की, त्यांनी 2016 म्हणजे आजपासून 4 वर्षाआधीच कोरोना व्हायरसवर वॅक्सीन तयार केली होती. इतकेच नाही तर याचे क्लीनिकल ट्रायलही केले होते. 3 / 11 nbcnews.com च्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने वैज्ञानिकांच्या एका टीमला वॅक्सीनचं काम थांबवण्यास सांगितलं. जेव्हा टीमने कारण विचारलं तेव्हा एनआयएचकडून असं सांगण्यात आलं की, सध्या यात आम्हाला काहीही इंटरेस्ट नाही. म्हणजे जर अमेरिकेने 4 वर्षाआधी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती. (यावर क्लिक करून वाचू शकता : https://www.nbcnews.com/health/health-care/scientists-were-close-coronavirus-vaccine-years-ago-then-money-dried-n1150091) 4 / 11 आता प्रश्न हा उभा राहतो की, अशा घातक व्हायरस विरोधात अमेरिकेने इंटरेस्ट का दाखवला नाही? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी दोन दशकांचा घटनाक्रम जाणून घ्यावा लागेल. 5 / 11 चीनच्या ग्वांझोमध्ये एका अनोळखी व्हायरसमुळे 2002 मध्ये महामारी पसरली होती. वैज्ञानिकांनी याला SARS असं नाव दिलं होतं. या व्हायरसने संक्रमित व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत होता. वैज्ञानिकांनी याचा शोध लावला की, सार्स हा आजार कोरोना व्हायरसमुळे होतो. सोबतच याचाही शोध लावला की, हा सार्स प्राण्यातून मनुष्यात आला. 6 / 11 त्यावेळी 29 देशात हा आजार पसरला आणि जवळपास 800 लोकांचा याने जीव गेला होता. त्यावेळी वेगवेगळ्या देशांनी यावरील वॅक्सीन तयार करण्यावर काम सुरू झालं होतं. यातील काही वैज्ञानिक वॅक्सीन तयार करण्यास यशस्वी झाले होते आणि ते क्लीनिकल ट्रायलसाठी तयार होते. दरम्यान सार्सवर नियंत्रण मिळवण्यात आलं आणि जगभरातील यावर सुरू असलेले शोध थांबवण्यात आले. 7 / 11 सार्सच्या एक दशकानंतर 2012 मध्ये आणखी एका व्हायरसने लोकांना संक्रमित करण्यास सुरू केलं. याला मर्स असं नाव देण्यात आलं. त्यावेळी सुद्धा या व्हायरसला मात देण्यासाठी वॅक्सीन तयार करण्यावर काही वैज्ञानिकांनी जोर दिला होता. पण जगभरातील सरकारांनी वैज्ञानिकांच्या या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. आणि कोरोना व्हायरसची वॅक्सीन तयार करण्याचं काम बंद राहिलं. 8 / 11 आता मर्सच्या 8 वर्षांनंतर आणि सार्सच्या 18 वर्षांनंतर त्याच फॅमिलीतील SARS-Cov-2 ने साधारण 20 लाख लोकांना संक्रमित केलं. आता पुन्हा एकदा लोक याची वॅक्सीन कधी तयार होईल? असा प्रश्न विचारत आहेत. 9 / 11 जगभरातील सरकारांच्या दुर्लक्षा नंतरही अमेरिकेतील ह्यूस्टनमधील वैज्ञानिकांच्या एका टीमने कोरोना व्हायरसवर वॅक्सीन तयार करण्याचं काम सुरूच ठेवलं. त्यांनी 2016 मध्ये वक्सीन तयार करण्यात यशही मिळवलं होतं. 10 / 11 बेअलर कॉलेज ऑफ मेडिसीनच्या नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीनच्या सह-निर्देशिका डॉ. मारिया एलीना बोट्टाजी यांनी सांगितले की, 'आम्ही कोरोना व्हायरसवरील वॅक्सीनचे ट्रायलही पूर्ण केले होते. सुरूवातीचे प्रॉडक्शन ट्रायलही संपवले होते. नंतर आम्ही अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थला विचारले की, आम्ही हे वॅक्सीन क्लीनिकपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करू शकतो? त्यावर आम्हाला उत्तर मिळालं की, सध्या यात आम्हाला काहीही इंटरेस्ट नाही'. हे वॅक्सीन सार्स महामारी विरोधात तयार करण्यात आलं होतं. 11 / 11 चीनमध्ये याची सुरूवात झाली होती आणि तिथे या महामारीवर नियंत्रण मिळवलं गेलं होतं. त्यामुळे या वॅक्सीनवर रिसर्च करणारे वैज्ञानिक आणखी पैसा जमवण्याच्या स्थितीत नव्हते. अमेरिकाच नाही तर जगभरातील वैज्ञानिकांना कोरोनावर वॅक्सीन शोधण्याचे रिसर्च बंद करावे लागले होते. कारण लोकांचा यातील इंटरेस्ट कमी झाला होता. वैज्ञानिकांना रिसर्च करण्यासाठी पैसे मिळत नव्हते. आता डॉ. मारियाच्या टीमने त्यांची वक्सीन कोविड-19 च्या हिशेबाने अपडेट करण्यावर काम सुरू केलं आहे. एनआयएच अजूनही त्यांना पूर्ण पैसे देत नाहीये. आणखी वाचा