Coronavirus if one do not wear a mask 8 lakh rupees will fine in Germany SSS
Coronavirus : बापरे! मास्क लावला नाही तर तब्बल 8 लाखांचा दंड, 'या' देशाने घेतला निर्णय By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 1:36 PM1 / 12जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. तर इटली, स्पेन, युरोपमधील परिस्थिती गंभीर आहे.2 / 12वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 212,69 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 3,087,105 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. 3 / 12भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 31,332 हून अधिक झाली असून आतापर्यंत 1007 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.4 / 12देशात आणि जगात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात दिलासादायक माहिती मिळत आहे. देशात 7027 तर जगात 935,115 जणांनी कोरोनावर मात करून कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे.5 / 12कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 6 / 12कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे.7 / 12जर्मनीमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी कायदे कडक करण्यात आले आहे. मास्क न लावल्यास तब्बल 8 लाखांचा दंड आकारण्यात येणार आहे. 8 / 12जर्मनीत नव्या नियमानुसार, सार्वजनिक वाहतूक, लांब पल्ल्याच्या ट्रेन आणि दुकानांत सामान खरेगी करताना मास्क लावणे आवश्यक आहे. देशातील 16 पैकी 15 राज्यांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे.9 / 12मास्क ड्यूटीच्या नावाने तयार केलेल्या या नव्या कायद्याचे उल्लंघन केल्यास मोठा दंड आकारला जाणार आहे.10 / 12दंडाची रक्कम 25 युरो म्हणजेच 2 हजारांपासून ते 10000 युरो म्हणजेच 8 लाख 25 हजार रुपयांपर्यंत असणार आहे.11 / 12बर्लिन आणि ब्रॅंडेनबर्ग यांनी जनतेला मास्क लावण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. मात्र इतक्या मोठ्या संख्येने दंड आकारला जाणार नसल्याचं सांगितलं आहे.12 / 12अनेक राज्यांनी मास्क न लावल्यास इतका मोठा दंड भरण्यास नकार दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications