शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : कोरोना पसरताच पुन्हा आधीचीच चूक करतोय चीन; जगाला महागात पडू शकते 'ही' लपवा-छपवी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 5:55 PM

1 / 10
चीनमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून कोरोनाने थैमान घातले आहे. वेगाने वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. धडकी भरवणारं चित्र सध्या चीनमध्ये पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने रुग्णालयं खचाखच भरली आहेत.
2 / 10
एकही बेड उपलब्ध नसल्याने जमिनीवर रुग्णांना ठेवून उपचार केले जात आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढल्याने शवागृहही भरली आहे. मृतदेहांचे ढीग पाहायला मिळत आहेत. अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा पार कोलमडली आहे. औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
3 / 10
कोरोना वेगाने पसरताच चीन जुनीच चूक करताना दिसत आहे. पुन्हा एकदा आकडे लपवत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचं भीषण संकट असताना अशाप्रकारे आकडे लपवणं हे अत्यंत घातक ठरू शकतं. त्यामुळे कोरोनाच्या गंभीरतेचा अंदाज घेणं अवघड होईल आणि त्याचा परिणाम भोगावा लागेल.
4 / 10
चीनने यावेळी कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा लपवण्यासाठी आता नवीन पद्धत शोधून काढली आहे. आपली वेगळी गाईडलाईन तयार केली आहे. श्वासासंबंधीत आजाराने रुग्णांचा मृत्यू झाला तरच कोरोनाने मृत्यू झाल्याचं मानलं जाईल असं त्यामध्ये म्हटलं आहे. तसेच इतर गोष्टींचा त्यामध्ये समावेश नाही.
5 / 10
चीनचं हे संकट जगासाठी येणाऱ्या काळात कसं संकट बनू शकतं. यावर वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक आर्टिकल छापण्यात आलं आहे. यामध्ये तसेच चीनचं सरकार हे आकडे लपवण्यासाठी ओळखलं जातं असं म्हटलं आहे. तसेच रुग्णांची नेमकी संख्या, मृतांचा आकडा हे सर्व कन्फ्यूजन असल्याचं म्हटलं आहे.
6 / 10
कोरोनाचे हे संकट पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवू शकतं. जसं की तीन वर्षांपूर्वी वुहानमध्ये झालेल्या कोरोना आऊटब्रेकने संपूर्ण जग ठप्प केलं होतं. चीनमधल्या गोष्टी या त्यांच्या देशापुरत्याच सीमित नसल्याचं देखील या आर्टिकलमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
7 / 10
चीनच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल होत असल्याने अनेकांना जमिनीवर झोपावं लागत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन महिन्यांत म्हणजेच 90 दिवसांत चीनची 60 टक्के आणि जगभरातील 10 टक्के लोकसंख्या कोरोनाने संक्रमित होऊ शकते.
8 / 10
ही केवळ सुरुवात असून कोरोनाच्या संक्रमणामुळे 20 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तर, 80 कोटी लोक कोरोनाबाधित होऊ शकतात असंही म्हटलं आहे. विषाणू तज्ज्ञ एरिक फेइगल यांच्या मते, चीनची राजधानी बीजिंगमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. शवागृह भरली आहेत. मृतदेह ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरची गरज असते.
9 / 10
2000 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले. ते म्हणाले की, 2020 ची परिस्थिती पुन्हा येत असल्याचे दिसते, परंतु यावेळी ते युरोपसह पाश्चात्य देशांमध्ये नाही तर चीनमध्ये घडत आहे. चीनमध्ये कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
10 / 10
चीनला कोरोना संसर्गामुळं डॉक्टरांची कमी जाणवत आहेत. बीजिंगच्या अनेक रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची देखील कमी जाणवत आहे. डॉक्टर्स कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. छोट्या शहरांमध्ये देखील ही समस्या आढळून येत आहे. पुन्हा एकदा चीनने जगाचं टेन्शन वाढवलं आहे.
टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या