शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus In China : औषध दुकाने नाही, थेट कारखान्यांसमोर रांगा; चीनमध्ये कोरोनाने स्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 10:02 AM

1 / 6
कोरोनामुळे चीनमधील आरोग्य सेवा कोलमडल्याने चक्क औषध कंपन्यांच्या कारखान्यांबाहेर लोक रांगेत उभे आहेत. औषधी दुकानातील औषधी संपुष्टात आल्यामुळे नागरिकांपुढे आता हाच शेवटचा पर्याय उरला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत जगभरात कोरोनाचे ५ लाख ८६ हजार २९६ नवीन रुग्ण आढळले आहेत.
2 / 6
चीनमधील सर्व औषधी दुकानांत तापासाठी आयब्रुफेन आणि इतर अनेक औषधे संपली आहेत. ताप, वेदना यासारख्या किरकोळ औषधांच्या खरेदीसाठी लोक लांबच लांब रांगेत उभे असल्याचे दिसून येते.
3 / 6
चीनमधील गंभीर परिस्थिती पाहूनही शी जिनपिंग लॉकडाऊन लादण्यास तयार नाहीत. देशाला अनलॉक करण्यासाठी, चीनने ३ वर्षं जुनी झीरो कोविड पॉलिसी देखील सोडली आहे. लोकांना सांगितले जात आहे की ओमायक्रॉन प्रकार धोकादायक नाही. त्यामुळे कामगारांना संसर्ग झाला असला तरी त्यांनी कामावर परतावे, असे आवाहन केले जात आहे.
4 / 6
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की कोरोनाचा जागतिक अंत घोषित करणे खूप घाईचे आहे. म्हणजेच कोरोना अजूनही जागतिक आणीबाणी राहील. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम म्हणाले, चीनमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. चीनमध्ये खरे आकडे समोर येत नाहीत.
5 / 6
चीनने लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटना कोरोना संकटात चीनला सर्व प्रकारे मदत करेल. त्यांनी चीनला कोरोना व्हायरससंदर्भातील आकडेवारी पुरविण्यास सांगितले आहे.
6 / 6
जर्मनीने बर्लिनमधून कोविड लसीची पहिली बॅच चीनला पाठवली आहे. ही लस चीनमध्ये राहणाऱ्या २० हजार जर्मन नागरिकांना दिली जाईल. आता जपान, दक्षिण कोरिया आणि फ्रान्समध्ये कोरोनाचा धोका वाढत आहे.एका आठवड्यात जगभरात कोरोनाचे ३५ लाख रुग्ण आढळले आहेत. तर ९ हजार ९२८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या