शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus: चीनच्या वुहान लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस! पुराव्यांसह महाराष्ट्रातील वैज्ञानिक दांपत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 9:58 AM

1 / 12
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीसंदर्भात विविध प्रकारचे कयास लावले जात आहेत. मात्र, सर्वाधिक संशय चीनच्या वुहान येथील लॅबवर व्यक्त केला जात आहे. महत्वाचे म्हणजे, जागतिक पातळीवर याला दुजोरा देणारे अनेक तथ्यही समोर ठेवले जात आहेत. यातच, महाराष्ट्रामधील पुण्यातील एका वैज्ञानिक दांपत्याने काही तथ्य एकत्रित केले आहेत. (CoronaVirus Indian scientist couple claim that origin of covid 19 possible from wuhan lab)
2 / 12
या वैज्ञानिक दांपत्याने एकत्रित केलेल्या तथ्यांवरून, सार्स-सीओव्ही-2 व्हायरस (कोविड-19) सी फूड मार्केटमधून नव्हे, तर वुहानमधील एका लॅबमधूनच उत्पन्न झाला, असे स्पष्ट होते. मात्र, कोरोना व्हायरसची उत्पत्ती सीफूड मार्केटमधूनच झाली, असा दावा चीन सातत्याने करत आहे.
3 / 12
आपल्या संशोधनासंदर्भात वैज्ञानिक डॉ. राहुल बाहुलिकर आणि डॉ. मोनाली राहलकर यांनी म्हटले आहे, की खरोखरच व्हायरस लीक झाला होता का, हे स्पष्टपणे माहीत नाही, पण हा एक मजबूत अंदाज आहे. कारण हा व्हायरस लॅबमधूनच लीक झाला, असा संकेत आमच्या संशोधनातून मिळतो.
4 / 12
ते म्हणाले, आम्ही 2020 मध्ये आमच्या संशोधनाला सुरुवात केली होती. सार्स-सीओव्ही-2 शी संबंधित आरएटीजी13 दक्षिण चीनच्या युन्नान प्रांतातील मोजियांगच्या गुहांमधून एकत्र करण्यात आले, असे आमच्या निदर्शनास आले.
5 / 12
आरएटीजी13 देखील एक कोरोना व्हायरसच आहे. हा व्हायरस वुहान इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी येथे नेण्यात आला. गुहांमध्ये मोठ्या प्रमाणावर वटवाघळं होती आणि हे साफ करण्यासाठी सहा खान कामगार ठेवण्यात आले होते. ते निमोनियासारख्या आजाराने संक्रमित झाले होते, असेही आम्हाला आढळून आले.
6 / 12
व्हायरसच्या जीनोममध्ये बदल केल्याने तयार झाला कोरोना - ते म्हणाले, वुहान इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि वुहानमध्ये इतरही काही लॅब व्हायरसवर प्रयोग करत होत्या. त्यांनीच व्हायरसच्या जीनोममध्ये काही बदल केल्याची शक्यता आहे आणि याच दरम्यान या कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली असावी, अशी शक्यता आहे.
7 / 12
त्यांनी सांगितले, की त्यांनी आपला पहिला प्री प्रिंट प्रकाशित केल्यानंतर एका ट्विटर यूझर सीकरशी संपर्क साधला. तो ड्रॅस्टिक नावाच्या एका समूहाचा भाग आहे. ड्रॅस्टिक यानी डिसेंट्रलाइज्ड रॅडिकल ऑटोनॉमस सर्च टीम इंव्हेस्टीगेटिंग कोविड-19 नाव दिले आहे. हा समूह कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीसंदर्भात पुरावे एकत्र करत आहे.
8 / 12
डॉ. बाहुलिकर यांनी सांगितले, की सीकर दडवून ठेवलेली संशोधन सामग्री शोधण्यात तरबेज आहेत. त्यांनी चिनी भाषेत एक थिसिस सार्वजनिक करताना खान कामगारांत झालेल्या गंभीर आजारासंदर्भातही सविस्तर माहिती दिली आहे. त्यांची लक्षणंही मोठ्या प्रमाणावर कोविड-19 शी मिळती जुळतीच होती. त्यांच्या सीटी स्कॅनची तुलनादेखील कोविड-19 ने संक्रमित रुग्णांशी करण्यात आली आणि ते जवळपास सारखेच असल्याचेही दिसून आले.
9 / 12
त्यांनी म्हटले आहे, की युन्नान खदानीतून पसरलेल्या कोविड-19 संदर्भातील थेअरी टिकाव धरत नाही, कारण युन्नानमध्ये कुठलीही केस नाही.
10 / 12
सीफूड मार्केटसंदर्भात कासल्याही प्रकारचे पुरावे नाहीत - आणखी एक थेअरी आहे, की व्हायरस वटवाघळांमधून हस्तांतरित झाला आणि नंतर तो सीफूड मार्केटमधून पसरला. मात्र, याचा काहीही पुरावा नाही. याच बरोबर, या व्हायरसची रचना अशी होती, की तो मानवाला संक्रमित करत होता आणि हा असा संकेत आहे, की तो एका लॅबमधूनच उत्पन्न झाला आहे.
11 / 12
हा व्हायरस लॅबमधून लीक झाल्याच्या संशयावर जागतिक आरोग्य संखटनेनेही (WHO) योग्य प्रकारे तपास केला नाही. आम्ही या थेअरीच्या योग्य तपासाची मागणी करत आहोत. यासंदर्भात आम्ही डब्ल्यूएचओला तीन पत्रही लिहिले आहेत, जे आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्येही प्रसिद्ध झाले आहेत, असेही या वैज्ञानिक दांपत्याने म्हटले आहे.
12 / 12
व्हायरस लॅबमधून लीक होऊ शकतो का, या थेअरीवर डब्ल्यूएचओने अत्यंत कमी काम केले आहे. आता अमेरिकेचे राष्ट्रपतीदेखील 90 दिवसांच्या आत या प्रकरणाचा तपास व्हायरला हवा, असे म्हणत आहेत. भारतानेही याचे समर्थन केले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनdoctorडॉक्टरResearchसंशोधनMaharashtraमहाराष्ट्र