coronavirus: Japan defeated Corona without lockdown BKP
coronavirus: लॉकडाऊन न करताच या मोठ्या देशाने कोरोनाला दिली मात, नागरिकांची ही सवय ठरली उपयुक्त By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 10:25 AM1 / 10चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूने जगातील बहुतांश देशात थैमान घातले आहे. काही देशात तर कोरोनामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरी चीनपासून जवळच असलेल्या एका मोठ्या देशाने आपल्याकडील कोरोनाची साथ संपूर्णपणे नियंत्रणात आणली आहे. 2 / 10या देशाचे नाव आहे जपान. कोरोनाची साथ नियंत्रणात आणल्यानंतर आता जपानमधील दैनंदिन जीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. 3 / 10पंतप्रधान शिंजो आबे यांनी आता कोरोनामुळे देशात लागू करण्यात आलेली आणीबाणी टोकियो आणि अन्य चार शहरांमधून हटवण्याची घोषणा केली आहे. त्याबरोबरच आता नागरिकांवरील राष्ट्रव्यापी निर्बंधही हटवले गेले आहेत. 4 / 10जपानमध्ये २४ मार्चपर्यंत कोरोनाचे एकूण १२,०० रुग्ण सापडले होते. तर ४३ जणांचा मृत्यू झाला होता. जपानमध्ये दररोज कोरोनाचे काही रुग्ण सापडत होते. पण त्यांची संख्या मर्यादित राहिली. जपानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १६ हजार ६०० रुग्ण सापडले असून, ८५० जणांचा मृत्यू झाला आहे. 5 / 10जपानला विविध कारणांमुळे कोरोनाचा खूप धोका होता. तसेच येथे ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असल्याने हा धोका अधिक वाढलेला होता. जपानमध्ये जानेवारी महिन्यात चीनमधून ९.२ लाख लोक आले होते. तर फेब्रुवारी महिन्यात ८९ हजार जणांनी चीनमधून जपानचा प्रवास केला होता. 6 / 10कोरोनाचे संकट समोर दिसताच जपानमध्ये सर्वप्रथम शाळा बंद करण्यात आल्या. त्यानंतर अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. मात्र दुकाने आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्यात आले. त्याबरोबरच घरातून काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. 7 / 10इतर देशांच्या तुलनेत जपानमध्ये कोरोनाच्या चाचण्या कमी करण्यात आल्या आहेत. मात्र जपान सरकारने टीकेवर फारसे लक्ष न देता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजा केल्या. जिथे कोरोनाचे रुग्ण सापडले तिथे कठोर उपाययोजना केल्या. 8 / 10दरम्यान, जपानी नागरिकांच्या काही परंपरागत सवयीसुद्धा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपयुक्त ठरल्या. जपानी लोक कुणालाही भेटल्यावर हस्तांदोलन, चुंबन वगैरे पद्धतीने अभिवादन करत नाहीत. त्यामुळे येथे सोशल डिस्टंसिंग पाळले गेले. त्यातच सतत हात धुणे आणि मास्क परिधान करण्याची सवय जपान्यांना आधीपासूनच होती. त्यामुळे येथे कोरोनाचा संसर्ग रोखणे इतर देशांच्या तुलनेत सोपे झाले. 9 / 10कोरोनाची साथ नसतानाही जपानमध्ये दरवर्षी सुमारे ५.५ अब्ज मास्कची विक्री होते. येथील प्रत्येक नागरिक सरासरी ४३ मास्क वापरतो. त्यामुळे कोरोना आल्यानंतर मास्कच्या वापरात वाढ झाली. 10 / 10आता कोरोना नियंत्रणात आला आहे. सरकारने आणीबाणी हटवली आहे. मात्र असे असले तरी जपानी नागरिक कुठल्याही सरकारी आदेशाविना सर्व नियम पाळत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications