शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास तीन पट अधिक सुरक्षा; रिसर्चमधून दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 1:34 PM

1 / 14
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 20 कोटींचा टप्पा पार केला. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
2 / 14
प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
3 / 14
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरू आहे. लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. कोरोना लस घेतलेल्या नागरिकांना आता एक मोठा दिलासा मिळाला आहे.
4 / 14
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना तीन पट अधिक सुरक्षा मिळत असल्याचा दावा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये याबाबत महत्त्वाचा रिसर्च करण्यात आला आहे.
5 / 14
कोरोना व्हायरसवर ब्रिटनमधील सर्वात मोठ्या रिसर्चपैकी एक असलेल्या 'रिअल टाइम असेसमेंट ऑफ कम्युनिटी ट्रान्समिशन' चा बुधवारी अहवाल प्रकाशित झाला. यामध्ये मोलाची माहिती देण्यात आली आहे.
6 / 14
अहवालानुसार, 20 मे ते सात जून दरम्यान इंग्लंडमध्ये कोरोना संसर्गाचा दर चारपटीने अधिक वाढला असून 0.13 टक्क्यांहून 0.63 टक्के अधिक झाला आहे. तर 12 जुलैनंतर संसर्ग दरात घट नोंदवण्यात आली.
7 / 14
लंडनच्या इम्पिरिअल कॉलेज आणि आयपीएसओएस मोरीच्या आकडेवारीनुसार, लंडनमध्ये 24 जून ते 12 जुलै दरम्यान झालेल्या संशोधनात 98 हजार स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला होता. त्यांच्यावर रिसर्च करण्यात आला.
8 / 14
रिसर्चनुसार, ज्या स्वयंसेवकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले त्यांना संसर्गाची बाधा होण्याची शक्यता तीन पटीने कमी होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याच दरम्यान डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे.
9 / 14
कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट हा सध्या संपूर्ण जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. या व्हेरिएंटची प्रत्यक्ष संसर्ग क्षमता जाणून घेण्यासाठी सतत रिसर्च सुरू आहे. याच दरम्यान चीनमध्ये (China) केलेल्या एका रिसर्चमध्ये नवी माहिती समोर आली आहे.
10 / 14
रिसर्चनुसार, सामान्य व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नाकात 1000 पटीने अधिक व्हायरस असतात. तसेच कोरोनाचा मूळ वुहान व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट खूपच संसर्गजन्य आणि धोकादायक आहे असं देखील म्हटलं आहे.
11 / 14
डेल्टा व्हेरिएंटमुळे संसर्ग झालेली व्यक्ती अधिक व्हायरस बाहेर टाकते, असं एका संशोधकाचे म्हणणं आहे. म्हणूनच हा व्हेरिएंट अधिक लोकांना संक्रमित करतो. तसेच हा अत्यंत वेगाने देखील पसरत आहे.
12 / 14
चीनचे गुआंगडोंग प्रोविंशियल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशन डिपार्टमेंटचे संशोधक जिंग लू आणि सहकाऱ्यांनी 62 कोरोना बाधितांवर संशोधन केलं आहे. सद्यस्थितीत चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत आहे.
13 / 14
अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे आणि टेस्टिंग-ट्रेसिंगचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) डेल्टा व्हेरिएंटच्या संसर्गजन्य संभाव्यतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
14 / 14
WHO ने म्हटलं होतं की, डेल्टा पॅटर्नशी संबंधित वाढीव प्रसारण क्षमतेमुळे प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होईल आणि विशेषतः कमी लसीकरणाच्या संदर्भात आरोग्य पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव येईल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस