शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेत डेल्टा ऐवजी ओमायक्रॉनने सर्वाधिक मृत्यू; जगभरात एका दिवसात 34.12 लाख नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 9:14 AM

1 / 14
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 37 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 373,097,559 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 5,676,084 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 14
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून 294,662,630 जण बरे झाले आहे. अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
3 / 14
वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच आता ओमायक्रॉनने देखील चिंता वाढवली आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशही आता हतबल झाला आहे.
4 / 14
कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आणि मृतांचा सर्वाधिक आकडा हा अमेरिकेत आहे. जगभरातील अनेक ठिकाणी ओमायक्रॉन हा डेल्टाच्या तुलनेत अधिक घातक नसल्याचं म्हटलं जात आहेत. पण अमेरिकेत तो खतरनाक होत असल्याचं सिद्ध होत आहे.
5 / 14
डेल्टाच्या तुलनेत अमेरिकेत ओमायक्रॉनमुळे दररोज जास्त लोकांचा मृत्यू होत आहे. अमेरिकेत एका दिवसांत 2267 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे तेथील परिस्थिती ही गंभीर झाली आहे.
6 / 14
जगभरात एका दिवसात तब्बल 34.12 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 10330 जणांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबरच्या मध्यापासून अमेरिकेत सात दिवसांच्या सरासरी मृत्यूची संख्या वाढत आहे.
7 / 14
इर्विनच्या लिफोर्निया विद्यापीठातील सार्वजनिक आरोग्य प्राध्यापक अँड्र्यू नोयमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉनमुळे आपण लाखो लोक गमावू शकतो. आपण वेगळं काय करू शकतो आणि किती जीव वाचवू शकतो यावर चर्चा व्हायला हवी.
8 / 14
अमेरिका सध्या 5.22 लाख नव्या रुग्णसंख्येसह जगात अव्वल आहे, तर फ्रान्स 3.53 लाख रुग्णांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ब्राझील 2.57 प्रकरणांसह आहे. गेल्या दोन वर्षांत जगभरात एकूण 37 कोटी लोकांना संसर्ग झाला असून 56 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
9 / 14
WHO ने चीनच्या तज्ज्ञांनी शोधलेल्या 'नियोकोव' या नवीन व्हायरसबद्दल म्हटलं आहे की, यावर आणखी अभ्यासाची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वटवाघळांमध्ये आढळणारा हा व्हायरस सध्या प्राण्यांमध्ये वेगाने पसरत आहे.
10 / 14
भविष्यात तो मानवांसाठीही धोकादायक असल्याचा निष्कर्ष चिनी संशोधकांनी काढला आहे. यावर डब्ल्यूएचओने सांगितले की, या व्हायरसचा मानवांवर होणाऱ्या परिणामाबाबत अजून अभ्यासाची गरज आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
11 / 14
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये प्रभावी रोग प्रतिकारशक्ती विकसित होते, जी फक्त ओमायक्रॉनच नाही तर डेल्टासह इतर प्रकारांनाही निष्प्रभ करू शकते. रिसर्चमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
12 / 14
आयसीएमआरने (ICMR) केलेल्या रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉन-निर्मित प्रतिकारशक्ती व्हायरसच्या डेल्टा थोपवू शकते. यामुळे डेल्टा पासून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
13 / 14
डेल्टाचा संसर्ग संपुष्टात येईल, असेही मत रिसर्चमध्ये मांडण्यात आले आहे. या संशोधनात ओमायक्रॉनवर लस बनविण्यावर भर देण्यात आला आहे. AstraZeneca, Moderna, Pfizer यासह इतर अनेक कंपन्या नवी लस बनवण्याच्या तयारीत आहेत.
14 / 14
मार्चच्या अखेरीस ही लस ओमायक्रॉनला टक्कर देण्यासाठी बाजारात येईल असा दावा केला जात आहे. PTI च्या वृत्तानुसार, ICMR ने एकूण 39 लोकांचा अभ्यास केला, त्यापैकी 25 जणांनी AstraZeneca च्या अँटी-कोरोना व्हायरस लसीचे दोन्ही डोस घेतले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनAmericaअमेरिकाCorona vaccineकोरोनाची लस