CoronaVirus Live Updates austria lockdown no corona vaccination europe detail
CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धसका! लसीकरण नाही तर स्वातंत्र्य नाही; 'या' देशात लस न घेणाऱ्यांसाठी लॉकडाऊन By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 9:36 AM1 / 14वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी तर अत्यंत बिकट स्थिती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. 2 / 14जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 25 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या ही 254,027,824 वर पोहोचली आहे. तर 5,115,156 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 229,681,206 जण बरे झाले आहेत. 3 / 14संपूर्ण जगालाच कोरोनाने विळखा घातला आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. सर्वच देशात वेगाने लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. युरोपमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. 4 / 14युरोपच्या काही भागातील परिस्थिती ही चिंताजनक आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं आहे. मात्र तरी देखील वेगाने कोरोनाचा प्रसार होत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे प्रशासनाने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 5 / 14युरोपच्या ऑस्ट्रियामध्ये लस न घेणाऱ्यांविरोधात एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. सरकारने अशा लोकांसाठी लॉकडाऊन लावला आहे. ज्या लोकांनी ऑस्ट्रियामध्ये कोरोनाची लस घेतली आहे. त्यांना सुविधा देण्यात येत आहेत. 6 / 14लसीकरण झालेल्या लोकांनी रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये जाता येत असून तिथे सुविधा देण्यात येत आहेत. मात्र ज्य़ा लोकांनी कोरोना लस घेतलेली नाही त्यांना घरामध्येच राहावं लागणार आहे. त्यांना फक्त जीवनावश्यक वस्तू आणण्याची आणि डॉक्टरांकडे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. 7 / 14ज्या लोकांना आता कोरोनाची लागण झाली आहे आणि अजूनही ते बरे झालेले नाहीत अशांना देखील लॉकडाऊनमध्ये राहावं लागणार आहे. ऑस्ट्रियाचे चान्सलर एलेझेंडर शालेनबर्ग यांनी या कठोर नियमांची घोषणा केली आहे. 8 / 14ऑस्ट्रियामध्ये सीमित लोकांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच लसीकरणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग चांगला असून आतापर्यंत 65 टक्के लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.9 / 14ऑस्ट्रियामध्ये कोरोनाचे 13000 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 11700 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच लॉकडाऊन करण्यात आला आहे. सीमित लोकांसाठी नियमावली जारी करणारा ऑस्ट्रिया हा पहिला देश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 14जर्मनीमध्ये कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या नोंदवली गेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा युरोपमध्ये महामारीच्या धोक्याचा इशारा दिला आहे. ज्या आरोग्य कर्मचार्यांना लसीकरण केले गेले नाही त्यांना पुढील वर्षी 1 एप्रिलपासून लसीकरण करणे आवश्यक आहे असं ब्रिटनने म्हटलं आहे.11 / 14रशिया हा युरोपमधील साथीच्या रोगाने सर्वाधिक प्रभावित झालेला देश आहे. फक्त मॉस्कोमध्ये संसर्गाची 3,927 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात देशात दररोज सुमारे 40 हजार नवीन रुग्ण येत आहेत, तर दररोज 1,100 हून अधिक लोकांचा संसर्गामुळे मृत्यू होत आहे.12 / 14जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) युरोपमध्ये महामारीमुळे मृत्यू होण्याच्या संख्येत 10 टक्के वाढ झाली आहे असं म्हटलं आहे. डब्ल्यूएचओचे युरोपीयन क्षेत्राचे संचालक हंस क्लुज यांनी गेल्या आठवड्यात युरोप महामारीच्या केंद्रस्थानी परतला आहे असं सांगितलं.13 / 14कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतेही उपाय न केल्यास फेब्रुवारीपर्यंत या भागात आणखी 500,000 मृत्यू होऊ शकतात. डब्ल्यूएचओने युरोप हा जगातील एक असा प्रदेश बनला आहे जिथे संक्रमित आणि मृतांची संख्या सतत वाढत आहे असं म्हटलं आहे.14 / 14कोरोनाचा वेग सध्या मंदावत असला तरी काही ठिकाणी मात्र अद्यापही भीषण परिस्थिती आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून मृतांचा आकडा देखील वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications