CoronaVirus Live Updates china imposed lockdown in yuzhou city after three corona cases
CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धसका! फक्त 3 रुग्ण आढळले म्हणून चीनने 10 लाख लोकसंख्येच्या शहरात केलं लॉकडाऊन By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 12:35 PM1 / 14वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 29 कोटींचा टप्पा पार केला आहे. अनेक प्रगत देश कोरोना व्हायरसपुढे हतबल झाले आहेत. 2 / 14कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 293,005,573 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 5,466,034 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 255,427,243 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.3 / 14चीनच्या वुहानमधून कोरोनाचा वेगाने प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे.4 / 14चीनने जगाचं टेन्शन वाढवलं असून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनमधील अनेक शहरांमध्ये कठोर निर्बंध लागू करत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.5 / 14चीनमधील एका शहरात कोरोनाचे फक्त तीन रुग्ण आढळले म्हणून जवळपास 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात लॉकडाऊन केलं आहे. या तिन्ही रुग्णांना कोणतीही लक्षणं पाहायला मिळत नाहीत.6 / 14चीनच्या यूझूमध्ये पूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. शहरातील सर्व नागरिकांना कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी घराबाहेर न पडण्याची सूचना करण्यात आली आहे. या शहराची लोकसंख्या 10 लाखांहून अधिक आहे. 7 / 14गेल्या काही दिवसांत येथे तीन रुग्ण आढळल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आणि उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनादेखील करण्यात आल्या आहेत.8 / 14शहरात आधीच बस आणि टॅक्सी सेवा बंद करण्यात येत असल्याची तसेच शॉपिंग मॉल्स, म्युझियम आणि पर्यटनस्थळं बंद करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. चीनमध्ये सोमवारी 175 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.9 / 14हेनान प्रांतात पाच तर निंगबो शहरातील कापड कारखान्यात आठ जणांना लागण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चीनमधील रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 14चीनमधील शियान शहरातील नागरिकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी घरातील एकाच व्यक्तीला दिवसाआड बाहेर पडण्याची मूभा देण्यात आली आहे.11 / 14एक कोटी 30 लाख लोकसंख्या असलेलं हे शहर आहे. कोरोनाचा धोका असल्याने अगदीच अत्यावश्यक कामासाठी शहराबाहेर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठीही सरकारकडून विशेष परवाना जारी करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे.12 / 14चीनसमोर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान आहे. फेब्रुवारी महिन्यात असणाऱ्या विंटर ऑलिपिक खेळांसाठी जगभरातील वेगवेगळ्या देशांमधून खेळाडू चीनमध्ये दाखल होणार आहेत.13 / 14चीन सध्या डेल्टा आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्ण तयारी करत असल्याचं चित्र दिसतं आहे. येथे लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात असे आदेश देण्य़ात आले आहेत.14 / 14देशातील मुख्य शहरांमध्ये मोठ्या सभा आणि गर्दी जमण्यापासून रोखण्यासाठी तसेच प्रवासावर बंदी घालण्यासंदर्भातील निर्णयांवर विचार सुरू आहे. शियान शहरातून देशभरात संसर्ग होण्याची भीती आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications