CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! अमेरिकेत दररोज 1 लाख नवे रुग्ण; शवागृहात मृतदेहांचा खच, परिस्थिती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 10:56 IST
1 / 12कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असं असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. 2 / 12कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 21 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशातं कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 3 / 12कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.4 / 12अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटीचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत आता पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आहे.5 / 12एका दिवसात कोरोनाचे तब्बल 1 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढली आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे.6 / 12अमेरिकेतील फ्लोरिडा हे कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे. न्यूज एजन्सी एपीच्या रिपोर्टनुसार, मध्य फ्लोरिडामध्ये कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे रुग्णालयाच्या शवागृहात मृतदेहांसाठी जागाच शिल्लक नाही. 7 / 12शवागृहात मृतदेहांचा खच पाहायला मिळत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फ्लोरिडामध्ये सर्वाधिक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रांतात सध्या 17 हजारांहून अधिक रुग्ण भरती आहेत. 8 / 12अमेरिकेतील वाढत्या रुग्णसंख्येने रेकॉर्ड केला आहे. मृतांचा आकडा तर सातत्याने वाढत आहे. यासाठी डेल्टा व्हेरिएंट जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सहा लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. 9 / 12दररोज कोरोनाचे एक लाख नवे रुग्ण आढळून येत असून 1100 जणांचा मृत्यू होत आहे. तसेच लहान मुलांना देखील कोरोनाची लागण होत आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 12कोरोनाने रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याबाबतचे नवीन नियम तयार केले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही रुग्णसंख्या चिंताजनक आहे. 11 / 12अमेरिकेत कोरोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या भागांमधील लस घेतलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा मास्क घालावा लागणार आहे. आरोग्य प्रशासनाने लसीकरण झालेल्या या नागरिकांना मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत.12 / 12कोरोना संसर्गाचं प्रमाण जास्त तसेच धोकादायक ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना घरांमध्येही मास्क वापरण्याची शिफारस सीडीसी करत असल्याचं म्हटलं आहे. डेल्टा व्हेरिंएंटमुळे धोका अधिक वाढला आहे.