शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! चीनच्या 'या' शहरात कोरोनाचा हाहाकार; लॉकडाऊनमुळे 1.7 कोटी लोक घरातच बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 8:26 PM

1 / 15
जगभरात कोरोनाचा हाहकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 45 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2 / 15
अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही ठिकाणी भीषण परिस्थिती आहे. जगभरात कोरोनाने आतापर्यंत 6,064,256 लोकांचा बळी गेला आहे.
3 / 15
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 457,405,715 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 390,829,757 लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
4 / 15
चीनच्या वुहानमधून कोरोनाचा वेगाने प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे.
5 / 15
चीनने जगाचं टेन्शन वाढवलं असून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. चिनी मीडियानुसार, महामारीच्या सुरुवातीस वुहानमध्ये उद्रेक झाल्यानंतर आता देशात एकाच दिवसात सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.
6 / 15
चीनमध्ये प्रशासनाने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनसारखे निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. शेनझेन शहरात कोरोना लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानंतर शहरात राहणारे 1.7 कोटी लोक त्यांच्या घरात बंद झाले आहेत.
7 / 15
चीनच्या स्थानिक प्रशासनाने प्रथमच कोरोना रॅपिड टेस्ट सुरू केल्या आहेत. चीनमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा कहर केला आहे. शनिवारी येथे 3,300 हून अधिक कोविड-19 रुग्ण आढळून आले, जी गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक दैनंदिन प्रकरणे आहेत.
8 / 15
राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, जिलिनच्या ईशान्य प्रांतात 2,100 हून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. या दरम्यान बाहेरून आलेल्या 200 कोविड रुग्णांची पुष्टी झाली. याच क्रमाने आता चीनच्या शेनझेन शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानंतर 1.7 कोटी लोक त्यांच्या घरात कैद झाले आहेत.
9 / 15
शांघायमध्ये शाळा आणि उद्याने बंद करण्यात आली आहेत, तर बीजिंगमध्ये निवासी भागात प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. नवीन प्रकरणे प्राप्त झाल्यानंतर, बीजिंगमधील प्रशासनाने लोकांना घराबाहेर न पडण्यास सांगितले.
10 / 15
हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लॅमने यांनी या भागात कोविड संसर्गाची लाट अद्याप शिगेला पोहोचली नसावी. ते म्हणाले की, यावेळी आपण संक्रमणाचा सर्वोच्च टप्पा ओलांडला आहे, असे म्हणणे सोपे जाणार नाही, आपण अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
11 / 15
चीनने म्हटलं आहे की इतकी प्रकरणे म्हणजे कोविड शून्य धोरणाला मोठा धक्का आहे. त्याचबरोबर चीनमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर इतर देशही सतर्क झाले असून त्यांनी नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.
12 / 15
सध्या कोरोनाचा वेग मंदावताना पण असं असताना काही मात्र देशांनी टेन्शन वाढवलं आहे. तेथील परिस्थिती अत्यंत वाईट असून कोरोना रुग्णांच्या, मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे.
13 / 15
जागतिक आरोग्य संघटनेच्या साप्ताहिक रिपोर्टनुसार, 28 फेब्रुवारी ते 6 मार्च 2022 दरम्यान कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत पाच टक्क्यांची तर मृतांच्या आकड्यात आठ टक्क्यांची घट पाहायला मिळत आहे.
14 / 15
रिपोर्टनुसार, पॅसिफिकच्या पश्चिम भागात कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. एका आठवड्यात नव्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. तब्बल 46 टक्क्यांची वाढ झाली आहे.
15 / 15
मंगोलिया, चीन, ऑस्ट्रेलिया, कम्बोडिया, फिज़ी, जपान, मलेशिया, लाओस, फिलिपीन्स, न्यूझीलँड, सोलोमन द्वीप, सिंगापूर, दक्षिण कोरिया, पलाऊ, व्हिएतनाम, पापुआ न्यू गिनीसारख्या देशांचा समावेश आहे.
टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या