CoronaVirus Live Updates corona virus in china shanghai and beijing tightened covid curbs
CoronaVirus Live Updates : भयावह! शांघाई-बीजिंगमध्ये कोरोनाचा हाहाकार; लोक घरात कैद: सामानाच्या डिलिव्हरीवर बंदी By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 10:52 AM1 / 14जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 51 कोटींचा टप्पा पार केला एकूण संख्या 517,779,437 वर पोहोचली आहे. तर 6,278,165 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 14प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले असून अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने टेन्शन वाढलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 3 / 14चीनमधील एक छोटं शहर झिरो कोविड पॉलिसीचा सामना करत आहे. येथे नवव्यांदा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. रुइली असं या शहराचं नाव असून हे शहर चीन आणि म्यानमारमधील व्यापाराचं मोठं केंद्र आहे.4 / 14चीनच्या जीरो कोविड पॉलिसीवर देखील आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शांघाईमध्ये सतत सहा आठवडे लॉकडाऊन आहे. काही जिल्ह्यातील लोकांनी घरातून बाहेर पडू नका अशी नोटीस देण्यात आली आहे. 5 / 14शांघाईमध्ये राहणाऱ्या कोको वांग यांनी हे जेलसारखं असल्याचं म्हटलं आहे. तसेच आम्हाला कोरोनाची नाही तर येथील नियमांची भीती वाटत असल्याचं म्हटलं आहे. बीजिंगमध्ये देखील कडक नियमावलीची घोषणा करण्यात आली आहे. 6 / 14सर्व नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार होईल असं काही करू नका असंही सांगण्यात आलं आहे. काही रेस्टॉरंट, सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. 7 / 14अनेक इमारती आणि पार्क देखील सील करण्यात आल्या आहेत. चीनच्या या कडक नियमांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडत आहे. तसेच तेथील अनेक व्यवसायांना देखील याचा फटका बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 8 / 14चीनमध्ये कोरोनाचा सुस्साट वेग पाहायला मिळत असून तो पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. शांघाईमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. लॉकडाऊनमुळे दिवसातून एकदाच लोकांना जेवण मिळतं.9 / 14शांघाईमध्ये कडक ल़ॉकडाऊन लावण्यात आला आहे. कडक लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अन्नधान्याचा तुडवडा निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णवाहिकेच्या लाईनमध्ये लोकांचा मृत्यू होत आहे.10 / 14चीनमधील एक छोटं शहर झिरो कोविड पॉलिसीचा सामना करत आहे. येथे नवव्यांदा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. रुइली असं या शहराचं नाव असून हे शहर चीन आणि म्यानमारमधील व्यापाराचं मोठं केंद्र आहे.11 / 14चीनमधील शांघाईमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने खाद्यपदार्थांच्या वितरणात अनेक अडचणी येत आहेत. अन्नपदार्थांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.12 / 14मेगा सिटीतील लोक खाण्यापिण्यासाठी तडफडत आहेत. शहरातील नागरिकांना दिवसातून फक्त एकदाच अन्न मिळत आहे. स्थानिक लोकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांना दिवसातून एकदाच जेवण मिळते. ते किती दिवस जिवंत आहेत, हे त्यांनाच माहीत नाही.13 / 14शांघाईमधील रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत. सर्व वॉर्ड भरलेले असून नव्या रुग्णांना जागाच शिल्लक राहिलेली नाही. आरोग्य यंत्रणेवर देखील ताण आला असून प्रशासनाची चिंता वाढली आहे.14 / 14मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी केली जात आहे. असे असूनही शांघाईमध्ये कोरोनाचा संसर्ग अजूनही आटोक्यात येऊ शकला नाही. लोकांना त्यांच्या घरात कैद करण्यास भाग पाडले गेले आहे. झिरो कोविड धोरणांतर्गत येथे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications