शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! जगभरात कोरोनाचा विस्फोट, रुग्णसंख्या 50 कोटी; 'या' देशांत परिस्थिती वाईट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 2:48 PM

1 / 13
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगातील सर्वच देश या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. पण असं असताना पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे.
2 / 13
जगभरात कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 50 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 507,044,304 वर पोहोचली आहे. तर 6,232,269 लोकांचा मृत्यू झाला आहे.
3 / 13
उपचारानंतर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. 459,318,192 लोक बरे झाले आहेत. असं असतान अनेक देशांमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अमेरिका, ब्राझील, भारत या जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देशांमध्ये परिस्थिती गंभीर आहे.
4 / 13
अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. तेथे कोरोनाग्रस्तांची संख्या आठ कोटींच्या पुढे गेली असून, कोरोनामुळे मृतांचा आकडा दहा लाखांच्या पुढे गेला आहे. भारतात रुग्णांचा आकडा 4 कोटींच्या पुढे गेला असून मृतांचा आकडा पाच लाखांवर पोहोचला आहे.
5 / 13
ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांचा आकड्याने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा साडेसहा लाखांवर पोहोचला आहे. या तीन देशांमध्ये जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. फ्रान्स, जर्मनी आणि यूकेमध्ये दोन कोटींहून अधिक प्रकरणे आहेत.
6 / 13
रशिया, तुर्की, इटली, स्पेन, व्हिएतनाम आणि दक्षिण कोरियामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटीहून अधिक झाली आहे. अर्जेंटिनामध्ये 90 लाख, नेदरलँडमध्ये 79 लाख, तर इराणमध्ये कोरोनाच्या रुग्णांनी 71 लाखांचा आकडा पार केला आहे.
7 / 13
जपानमध्ये 68 आणि कोलंबियामध्ये 60 लाख प्रकरणे आहेत. इंडोनेशियामध्येही 60 लाख प्रकरणे आहेत. पोलंडमध्ये 59 लाख, मेक्सिकोमध्ये 57 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. युक्रेनमध्ये 49 लाख प्रकरणे आहेत.
8 / 13
मलेशियामध्ये 41 लाख कोरोना रुग्ण आढळले आहेत. इस्रायल, बेल्जियम, ऑस्ट्रियामध्ये 38 लाख तर दक्षिण आफ्रिकेत 37 लाख रुग्ण आहेत. फिलीपिन्स, थायलंडमध्ये 36 लाख आणि पोर्तुगाल, पेरूमध्ये 35 लाख प्रकरणे आहेत.
9 / 13
कॅनडा, चिली, स्वित्झर्लंडमध्ये 34 लाख प्रकरणे आहेत. डेन्मार्क, ग्रीस आणि रोमानियामध्ये 29 लाखांहून अधिक प्रकरणे आहेत. बांगलादेश आणि सर्बियामध्ये 19 लाख, हंगेरीमध्ये 18 लाख कोविड रुग्ण आहेत.
10 / 13
जॉर्डन आणि जॉर्जियामध्ये 16 लाख कोरोना रुग्ण आहेत. पाकिस्तान आणि स्लोवाकियामध्ये 15 लाख प्रकरणे आहेत. आयर्लंड, नॉर्वे, कझाकस्तानमध्ये 13 लाख प्रकरणे आहेत. मोरोक्को आणि बल्गेरियामध्ये 11 लाख कोरोना रुग्ण आढळले आहेत.
11 / 13
लेबनान, क्युबा, क्रोएशिया, ट्युनिशिया असे देश आहेत जिथे एकूण कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांच्या वर आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत बोलायचे झालं तर अमेरिका, ब्राझील आणि भारतानंतर रशियामध्ये 3 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत.
12 / 13
मेक्सिकोमध्येही कोरोनामुळे मृतांचा आकडा तीन लाखांवर पोहोचला आहे. पेरूमध्ये कोरोनामुळे दोन लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. कोरोनाने पोलंड आणि इराणमध्ये एक लाखाहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.
13 / 13
इंग्लंडमध्ये कोरोनामुळे एक लाख 60 हजार मृत्यू झाले आहेत. अर्जेंटिनामध्ये कोरोनामुळे मृतांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. इटलीमध्ये एक लाखाहून अधिक मृत्यू झाले आहेत, तर स्पेनमध्येही कोरोनामुळे मृतांचा आकडा एक लाखाच्या पुढे गेला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाIndiaभारतBrazilब्राझील