शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाचा Delta Variant अधिक खतरनाक; निष्काळजीपणा ठरू शकतो जीवघेणा; WHO चा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 4:51 PM

1 / 13
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
2 / 13
जगभरातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने तब्बल 18 कोटींचा टप्पा पार केला आहे, तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
3 / 13
कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने गंभीर इशारा दिला आहे.
4 / 13
WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी Delta Variant हा कोरोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. तसेच हा प्रकार घातक असून निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो असं देखील म्हटलं आहे.
5 / 13
'पहिल्यांदा भारतात आढळून आलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे जगातील जवळपास 85 देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत सापडलेल्या कोरोना व्हेरिएंटमध्ये हा प्रकार सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा प्रकार आहे.'
6 / 13
'आपण सर्वांनी सार्वजनिक आरोग्य आणि कोरोनासंदर्भातल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. त्यासोबतच या व्हायरलाला रोखायचं असल्यास जगातील सर्वच देशांमध्ये समान पद्धतीने लसींचा पुरवठा व्हायला हवा' असं देखील टेड्रॉस यांनी म्हटलं आहे.
7 / 13
टेड्रॉस यांनी व्यापक लसीकरणाची गरज व्यक्त केली आहे. हे लसीकरण जगातील सर्वच देशांमध्ये व्हायला हवं, अस त्यांनी नमूद केलं. यावेळी श्रीमंत देशांमध्ये होत असलेल्या गर्दीवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली.
8 / 13
'तुम्ही या देशांमध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला गर्दी दिसेल. जणूकाही साथ नाहीच आहे. मग तुम्ही ज्या देशांमध्ये लसींचा पुरवठा पुरेसा झालेला नाही अशा देशांमध्ये जा. तिथे तुम्हाला लॉकडाउन दिसेल' असं टेड्रॉस यांनी सांगितलं. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 13
ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार पाहायला मिळत आहे. गेल्या सात दिवसांमध्ये तब्बल 35 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची संख्या ही 1,11,157 वर पोहोचली आहे.
10 / 13
अधिकाऱ्यांनी साप्ताहिक आकडेवारी जाहीर करत गेल्या आठवड्यात डेल्टा व्हेरिएंटबाधितांच्या संख्येत 46 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती दिली आहे. ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग वेगाने होत आहे.
11 / 13
पब्लिक हेल्थ इंग्लंडने दिलेल्या माहितीनुसार, एकूण बाधितांपैकी 42 जणांना डेल्टा प्लस या व्हेरिएंटची बाधा झाली आहे. काही भागांमध्ये याचा प्रसार होण्याची अधिक शक्यता आहे. पीएचईने ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणाचाही फायदा होत आहे. दोन्ही डोस घेतल्यामुळे कोरोनापासून बचाव होत आहे.
12 / 13
ब्रिटनच्या आरोग्य अधिकारी डॉ. जेनी हॅरीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, यशस्वीपणे पार पडत असलेल्या कोरोना लसीकरण मोहीमेमुळे बाधितांची संख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणाचे संबंध तुटला जात आहे.
13 / 13
लशीचे दोन डोस एका डोस एका डोसच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दोन्ही डोस घेणे आवश्यक असून दुसऱ्या डोसची वेळ न चुकवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना