शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! 'या' देशात पाचव्या लाटेचा धोका?; रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 12:57 PM

1 / 13
संपूर्ण जग कोरोनाचा महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 24 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 242,355,857 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 4,929,480 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 13
जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान अनेकांनी कोरोनावर मात केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. जगभरात उपचारानंतर 219,691,611 जण कोरोनातून बरे झाले आहेत.
3 / 13
कोरोनाचा वेग सध्या मंदावत असला तरी काही ठिकाणी मात्र अद्यापही भीषण परिस्थिती आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून मृतांचा आकडा देखील वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
4 / 13
फ्रान्समध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढू लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात कोरोनाच्या पाचव्या लाटेचा धोका निर्माण झाला असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
5 / 13
फ्रान्समध्ये 24 तासांमध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या बाधितांची संख्या ही आता 15 वरून थेट 6,483 इतकी झाली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये 33 हजार 497 कोरोना रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
6 / 13
सध्याच्या आकडेवारीशी तुलना करता रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बाधितांच्या तुलनेत ही संख्या पाचपटीने कमी आहे. मात्र तरी देखील फ्रान्समध्ये कोरोनाच्या पाचव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. ब्रिटनमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
7 / 13
फ्रान्समध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 5,934 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मागील एका आठवड्याच्या तुलनेत सातत्याने मोठी वाढ होत आहे. फेब्रुवारीत कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
8 / 13
कोरोनामुळे ब्राझीलमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सहा लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या परिस्थिती बदलत असली तरी धोका मात्र अद्याप कायम असल्याचं चित्र समोर आलं आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
9 / 13
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढवली असून यामुळेच कोरोनाच्या आणखी एका लाटेचा धोका आहे. सध्या ब्राझीलमध्ये दररोज सरासरी 500 हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. एप्रिलमध्ये हा आकडा 300 होता.
10 / 13
देशातील 45 टक्क्यांहून अधिक लोकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत. तर वयोवृद्ध लोकांना बुस्टर डोस देण्यात येत आहेत. ऑनलाईन रिसर्च साइट आवर वर्ल्ड इन डेटानुसार, अमेरिका आणि जर्मनीच्या तुलनेत ब्राझीलमध्ये सर्वाधिक लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.
11 / 13
कोरोना मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वात जास्त मृत्यू हे अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेतील सात लाख 32 हजार लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर दुसरा नंबर ब्राझीलचा लागतो. सहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
12 / 13
तिसऱ्या नंबरवर भारत आहे. भारतामध्ये आता पर्यंत कोरोनामुळे साडे चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चौथ्या नंबरवर मेक्सिको आणि रशियाचा नंबर लागतो. कोरोनाचा वेग मंदावत अससा तरी मृतांच्या आकड्याने चिंता वाढवली आहे.
13 / 13
कोरोनापुढे अनेक प्रगत देश हतबल झाले आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकाच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याFranceफ्रान्स