CoronaVirus Live Updates : फ्रान्समध्ये कोरोनाचा विस्फोट! दर 1 सेकंदाला 2 जण पॉझिटिव्ह, रुग्णसंख्येनेही मोडला रेकॉर्ड By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 2:44 PM1 / 15जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 28 कोटींचा टप्पा पार केला आहेत तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 / 15फ्रान्समध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. येथे एका दिवसात 2 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महामारीची सुरुवात झाल्यापासून, फ्रान्समध्ये एका दिवसात इतके रुग्ण कधीच आढळले नव्हते.3 / 15सरकारने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 208,000 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. युरोपमधील साथीच्या आजारादरम्यान नोंदवल्या रुग्णसंख्येपेक्षा ही दैनंदिन संख्या सर्वाधिक आहे. 4 / 15'डेली मेल'च्या वृत्तानुसार, याबाबत माहिती देताना फ्रान्सचे आरोग्य मंत्री ओलिवियर वेरन यांनी परिस्थिती बिघडत चालली आहे. यापूर्वी, फ्रान्समध्ये एका दिवसात 180,000 प्रकरणे आढळून आली होती आणि आताच्या आकडेवारीने हा विक्रमही मोडल्याचं म्हटलं आहे 5 / 15वेरन यांनी फ्रान्समध्य़े दर सेकंदाला दोन लोक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. पॅरिसमध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेल्या रूग्णांपैकी 70% असे आहेत ज्यांना अद्याप लसीकरण करण्यात आलेले नाही असं देखील सांगितलं.6 / 15आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या डेल्टा प्रकारामुळे रुग्णालयांची स्थिती चिंताजनक आहे. Omicron variant च्या परिणामकारकतेबद्दल आताच फारसे काही सांगता येत नाही.7 / 15फ्रान्समधील परिस्थिती झपाट्याने बिघडत आहे आणि मी याला कोरोनाची त्सुनामी म्हणेन. गेल्या काही दिवसांत संसर्गाची प्रकरणे विक्रमी पातळीवर पोहोचली आहेत, ही निश्चितच चिंतेची बाब असल्याचं वेरन यांनी म्हटलं आहे. 8 / 15'फ्रेंच लोकसंख्येपैकी सुमारे 10 टक्के लोक व्हायरसने संक्रमित झालेल्या एखाद्याच्या संपर्कात आले. व्हायरस वेगाने पसरत आहे, म्हणून आपण नेहमीपेक्षा अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.'9 / 15ज्यांना लसीचा बूस्टर डोस मिळालेला नाही, ज्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे, त्यांनी अतिरिक्त खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. कोविड रूग्णांना रुग्णालयांच्या ICU मध्ये दाखल करण्य़ात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 15जागतिक आरोग्य संघटनेने आता एक धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉन हे डबल डेंजरस असल्याचं म्हटलं आहे. डेल्टानंतर आलेला ओमायक्रॉन यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढत आहे. 11 / 15ओमायक्रॉन आणि डेल्टा मिळून कोरोनाची त्सुनामी आणत आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येत चिंतेत भर टाकलेली असतानाच आता WHO ने हा गंभीर इशारा दिला आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टाची त्सुनामी प्रचंड काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणांवर मोठा तणाव आणेल असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. 12 / 15या तणावामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडेल असा इशाराच त्यांनी दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंट धोकादायक असून त्यांच्यामुळे रुग्णसंख्या नवे रेकॉर्ड नोंदवत असून रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यूंचं प्रमाणही वाढत आहे.13 / 15लसीकरणाच्या आधारे कोरोनावर पूर्पणणे नियंत्रण आणता येईल अशी अपेक्षा असतानाच कोरोनाचे नवे व्हेरियंट नवं आव्हान निर्माण करत आहेत. यामुळे अनेक देशांनी पूर्वतयारी करत निर्बंध लावण्यासही सुरुवात केली आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे. 14 / 15'मला ओमायक्रॉनसंबंधी फार चिंता आहे, हा फार संसर्गजन्य आहे. डेल्टा असतानाच ओमायक्रॉन आल्याने केसेसची त्सुनामी येत आहे' असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी सांगितलं आहे. 15 / 15गेल्या आठवड्यात जागतिक रुग्णसंख्या 11 टक्क्यांनी वाढली असून अमेरिका आणि फ्रान्स यांनी बुधवारी सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. टेड्रोस यांनी 'आधीच थकलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर यामुळे खूप तणाव येणार असून आरोग्य यंत्रणा कोसळण्याची भीती आहे' असंही म्हटलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications