CoronaVirus Live Updates : भयावह! कोरोनाला हलक्यात घेणं ठरेल जीवघेणं; 53 देशांमध्ये नव्या लाटेचा धोका, WHO चा गंभीर इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2021 9:50 AM1 / 14जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 24 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण आकडा 249,328,086 वर पोहोचला आहे. तर 5,044,892 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 14कोरोनाच्या नवनवीन प्रकारामुळे जगभराची चिंता वाढत आहे. अनेकांनी अपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. 225,822,793 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. याच दरम्यान आता एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. 3 / 14कोरोनाच्या महाभयंकर संकटाला हलक्यात घेणं आता जीवघेणं ठरू शकतं. तब्बल 53 देशांमध्ये नव्या लाटेचा धोका निर्माण झाला असून WHO ने याबाबत गंभीर इशारा दिला आहे. लसीकरणानंतरही युरोप कोरोना महामारीचं केंद्र झालं आहे. 4 / 14जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असतानाच काही देशांनी टेन्शन वाढवलं आहे. 53 देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या आणखी एका लाटेचा धोका आहे किंवा यातील बरेच देश आधीच महामारीच्या नवीन लाटेचा सामना करत आहेत. 5 / 14जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख डॉ. हॅन्स क्लुज यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांची संख्या ही पुन्हा विक्रमी पातळीवर वाढू लागली आहे. या भागात कोरोना प्रसाराचा वेग ही बाब गंभीर चिंतेचा विषय आहे.6 / 14जर हे असंच सुरू राहीलं तर फेब्रुवारीपर्यंत आणखी पाच लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो असं देखील म्हटलं आहे. जगभरात लसीकरण वेगाने सुरू असताना देखील अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. 7 / 14डेन्मार्कमधील कोपनहेगन येथील संघटनेच्या युरोप मुख्यालयात त्यांनी पत्रकारांना सांगितले की, 'आपण महामारीच्या उद्रेकाच्या एका गंभीर टप्प्यावर उभे आहोत. युरोप पुन्हा एकदा साथीच्या रोगाच्या केंद्रस्थानी आहे, जिथे आपण एक वर्षापूर्वी होतो.'8 / 14डॉ क्लुज म्हणाले की फरक हा आहे की यावेळी आरोग्य अधिकार्यांना व्हायरसबद्दल अधिक माहिती आहे आणि महामारीसोबत लढण्यासाठी चांगली साधने उपलब्ध आहेत. कोरोना प्रसार रोखण्यासाठीचे उपाय योग्य पद्धतीनं न केल्याने आता असं होत आहे.9 / 14काही भागात लसीकरणाचा कमी दर, हा सांगून जातो की कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ का होत आहे. डॉ क्लुज यांनी गेल्या एका आठवड्यात 53 देशांमध्ये कोविडमुळे रूग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने वाढले असल्याचं म्हटलं आहे.10 / 14हीच परिस्थिती कायम राहिल्यास फेब्रुवारीपर्यंत या देशांमध्ये साथीच्या आजारामुळे आणखी पाच लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. संघटनेच्या युरोप कार्यालयाने सांगितले, की या प्रदेशात आठवडाभरात 18 लाख नवीन प्रकरणं समोर आली आहेत.11 / 14मागील आठवड्याच्या तुलनेत यामध्ये आता सहा टक्के वाढ झाली आहे तर आठवडाभरात 24,000 रुग्णांचे मृत्यू झाले असून मृतांच्या संख्येत 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 14जगभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र तरी देखील मृतांचा आकड्याने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. कोरोना व्हायरसचं नवनवीन रुप समोर येत असल्याने धोका आणखी वाढला आहे.13 / 14कोरोनावर लाखो लोकांनी मात केली आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या पाच देशांमध्ये अमेरिका, ब्राझील, भारत, रशिया आणि मेक्सिकोचा समावेश आहे. जगभरातील एकूण मृतांपैकी 50 टक्के मृत्यू याच देशांमध्ये झाले आहेत.14 / 14फ्रान्समध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढू लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात कोरोनाच्या पाचव्या लाटेचा धोका निर्माण झाला असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications