शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! 'या' ठिकाणी शवागृह भरली खचाखच; मृतदेह ठेवण्यासाठी कमी पडतेय जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 2:52 PM

1 / 15
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 43 कोटींचा टप्पा पार केला असूण एकूण संख्या 437,378,113 वर पोहोचली आहे. तर 5,975,797 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 15
जगभरातील विविध रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू आहेत. अनेकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. 368,896,531 जण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
3 / 15
हाँगकाँगमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. हाँगकाँग कोरोना व्हायरसच्या सर्वात वाईट टप्प्याचा सामना करत आहे. येथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत.
4 / 15
कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 83 जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 300 लोकांनी एका आठवड्यात जीव गमावला आहे. रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयाअभावी काही जणांचा घरीच मृत्यू होत असल्याने त्याची कुठेही नोंद नाही.
5 / 15
रुग्णालयं आणि शवागृहात मृतदेह ठेवण्यास जागा कमी पडत असल्याचं चित्र आहे. रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येने रेकॉर्ड केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल असं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
6 / 15
हाँगकाँग पब्लिक डॉक्टर्स असोसिएशनचे प्रमुख टोनी लिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, डझनभर मृतदेह शहरातील रुग्णालयांमध्ये शवगृहात नेण्याची वाट पाहत आहेत. रुग्णालयातील अनेक मृतदेह लॉबीमध्ये पडलेले आहेत तर शवागृह पूर्णपणे भरलेली आहेत.
7 / 15
रूग्णालयात कर्मचार्‍यांचा तुटवडा जाणवत आहे. मृतदेह नेण्यासाठी अधिक वेळ लागेल असल्याने सरकारसुद्धा हतबल असल्याचं दिसत आहे. हाँगकाँगमध्ये मोठ्या संख्येने वृद्ध लोक आहेत. या वृद्धांचं लसीकरण केले गेले नाही. दुष्परिणामांमुळे अनेकांनी कोरोना लस घेतली नाही.
8 / 15
कोरोना व्हायरस नियंत्रणात आल्याने 2021 मध्ये अनेकांनी लसीकरण केले नाही. हाँगकाँगची लोकसंख्या सुमारे 74 लाख आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मृत्यूचा हा ट्रेंड असाच सुरू राहिला तर मे महिन्याच्या मध्यापर्यंत एकूण मृतांची संख्या 3,206 वर पोहोचेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 15
कोविड-१९ च्या चाचणीसाठी लोकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. चीनप्रमाणे येथेही शून्य-कोविड धोरण अवलंबले गेले. मात्र असे असूनही लोकांना अशा भीषण संकटातून जावे लागत आहे.
10 / 15
हाँगकाँगमध्ये लूनर न्यू ईयरच्या च्या सुट्ट्या असल्याने, कोरोना व्हायरसच्या दैनंदिन प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून हे घडत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
11 / 15
हाँगकाँगमधील रुग्णालये 90 टक्के क्षमतेने कार्यरत आहेत आणि काही रुग्णालये इतकी भरलेली आहेत की त्यांना बाहेरील खुल्या जागेत, रस्त्यांवर रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करावी लागते.
12 / 15
कोविड-19 च्या तपासणीसाठी लोकांची संख्याही वाढली आहे. त्यासाठीच मनोरंजन उद्यानासारख्या ठिकाणी तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हायरस पसरण्याच्या भीतीने रेस्टॉरंट्स देखील रिकामी आहेत आणि लोक त्यांच्या घरात बंद आहेत.
13 / 15
चीनमधील शहरांनी हाँगकाँगच्या लोकांना प्रवेश नाकारला आहे. ते म्हणतात की त्यांना क्वारंटाईन ठेवणं दूर, त्यांना देशात प्रवेश दिला जाणार नाही. संसर्ग पसरण्याच्या भीतीने हे करण्यात आले आहे.
14 / 15
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमागे ओमायक्रॉन प्रकार जबाबदार असल्याचे मानले जाते. या महिन्यात दैनंदिन संसर्गाच्या प्रकरणांमध्ये 60 पट वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे सरकारला आपल्या कोविड धोरणांमध्ये सुधारणा करावी लागली.
15 / 15
ओमायक्रॉनची लक्षणे सामान्य सर्दी आणि फ्लू सारखीच असतात, त्यामुळे संसर्गाचे निदान करणे कधीकधी कठीण असते, ज्यामुळे उपचारास विलंब होतो. सामान्य लक्षणे वाढत आहेत. यामुळे सतर्क असणं गरजेचं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉन