शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : भीषण! चीनमध्ये येणार कोरोनाची त्सुनामी; जुलैपर्यंत 16 लाख मृत्यूची भीती, रिसर्चमध्ये मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 11:49 AM

1 / 12
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या वाढत्या संख्येने चिंता वाढवली आहे.
2 / 12
चीनमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. यानंतर आता त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जुलैपर्यंत 16 लाख मृत्यूची भीती आहे. रिसर्चमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे.
3 / 12
चीनच्या फूडान युनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार, चीनने आपल्या झीरो कोविड पॉलिसीमध्ये थोडीशी जरी सूट दिली तर जुलैपर्यंत 16 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो. यामुळे पुन्हा कोरोनाचा धोका वाढला आहे.
4 / 12
चीनच्या वुहानमध्ये सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर जगभरात वेगाने त्याचा प्रसार झाला. चीनेन कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचं सांगितलं पण ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे तेथील परिस्थिती बिघडली.
5 / 12
डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन अधिक पटीने संक्रमक आहे. त्यामुळेच त्याच्यावर नियंत्रण मिळवणं हे आरोग्य अधिकाऱ्यांसाठी देखील अवघड झालं आहे. शांघाईमध्ये सर्वात वाईट परिस्थिती आहे.
6 / 12
शांघाईमध्ये सहा आठवड्यांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला असून 25 कोटींहून अधिक लोक लॉकडाऊनमध्ये आहेत. जर 16 लाख लोकांचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कारासाठी देखील जागा कमी पडेल असं म्हटलं आहे.
7 / 12
संशोधकांनी लसीकरणाचा वेग वाढवून मृतांचा आकडा कमी करता येईल असं म्हटलं आहे. ओमायक्रॉनच्या लाटेत जास्त मृत्यू हे 60 वर्षांवरील लोक आणि लसीकरण न झालेल्यांचा होऊ शकतो असंही सांगितलं आहे.
8 / 12
रिसर्चनुसार, जुलैमध्ये ओमायक्रॉनची लाट अधिक घातक ठरू शकते. या दरम्यान 11.22 कोटी केस आणि 51 लाखांहून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. चीनच्या आरोग्य व्यवस्थेवरील भार 16 पटीने वाढेल.
9 / 12
चीनच्या जीरो कोविड पॉलिसीवर देखील आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शांघाईमध्ये सतत सहा आठवडे लॉकडाऊन आहे. काही जिल्ह्यातील लोकांनी घरातून बाहेर पडू नका अशी नोटीस देण्यात आली आहे.
10 / 12
शांघाईमध्ये राहणाऱ्या कोको वांग यांनी हे जेलसारखं असल्याचं म्हटलं आहे. तसेच आम्हाला कोरोनाची नाही तर येथील नियमांची भीती वाटत असल्याचं म्हटलं आहे. बीजिंगमध्ये देखील कडक नियमावलीची घोषणा करण्यात आली आहे.
11 / 12
सर्व नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार होईल असं काही करू नका असंही सांगण्यात आलं आहे. काही रेस्टॉरंट, सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे.
12 / 12
अनेक इमारती आणि पार्क देखील सील करण्यात आल्या आहेत. चीनच्या या कडक नियमांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडत आहे. तसेच तेथील अनेक व्यवसायांना देखील याचा फटका बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन