शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : जगाचा नवा मंत्र... Live With Covid; 'या' देशाने हटवले कोरोनाग्रस्तांच्या सेल्फ आयसोलेशनचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 12:12 PM

1 / 15
कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 42 कोटींचा टप्पा पार केला आहे तर लाखो लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाल्याचं पाहायला मिळालं.
2 / 15
जगभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. पण आता लोक कोरोनासोबत जगत असून या महाभयंकर संकटापासून कसा बचाव करायचा याचाच प्रयत्न करत आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
3 / 15
Live With Covid हा जगाचा नवा मंत्र आहे. जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच ब्रिटनने एक मोठी घोषणा केली आहे. कोरोनाग्रस्तांनासाठी असलेलं सेल्फ आयसोलेशन आता हटवण्यात आलं आहे.
4 / 15
ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यापासून एक नवीन योजना तयार केली जाणार आहे. ज्यामध्ये लोक व्हायरससोबत जगणं शिकायला हवेत म्हणून पावलं उचलली जात आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच अशा गोष्टी करण्यात येत आहेत.
5 / 15
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रविवारी कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना आयसोलेट होण्याची गरज नाही अशी घोषणा केली आहे. कोरोनाबाबतच्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.
6 / 15
कोविड हा अचानक गायब होणार नाही. त्यामुळेच आपल्याला व्हायरससोबत जगण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यावर बंधन घालण्याची गरज नाही. त्याशिवाय देशील आपण संरक्षण करू शकतो असं जॉन्सन यांनी म्हटलं आहे.
7 / 15
'आम्ही गेल्या दोन वर्षांपासून कोरोना लसीकरण, नवी उपचार पद्धतीने आणि तज्ज्ञांचा सल्ला घेत जगत आहोत. कोरोना महामारीत लस हे सर्वात प्रभावी असून देशातील कोट्वधी लोकांना लस देण्यात आली आहे' असं म्हटलं आहे.
8 / 15
ब्रिटन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच लोकांच्या स्वातंत्र्यावर बंधनं येतील ते कोरोना नियम हटवण्यात येतील. कोरोना फ्लू सारखाच मानला जाईल. नव्या योजनांमध्ये गरज पडल्यास सर्व्हिलान्स सिस्टम असेल.
9 / 15
बोरिस जॉन्सन यांच्या घोषणेनंतर संशोधकांनी धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोना रुग्णांचं सेल्फ आयसोलेशन हटवणं अत्यंत जोखमीचं असल्याचं म्हटलं आहे. यामुळे वेगाने संसर्ग होऊ शकतो असं देखील सांगितलं.
10 / 15
कोरोनाच्या संकटात आता असं केल्यास भविष्यामध्ये ओमायक्रॉनपेक्षा ही अत्यंत धोकादायक व्हेरिएंट हा येऊ शकतो. त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
11 / 15
हाँगकाँगमध्ये कोरोना प्रकोप पाहायला मिळत आहे. हाँगकाँग कोरोना व्हायरसच्या सर्वात वाईट टप्प्याचा सामना करत आहे. येथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत.
12 / 15
कोविड-१९ च्या चाचणीसाठी लोकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. चीनप्रमाणे येथेही शून्य-कोविड धोरण अवलंबले गेले. मात्र असे असूनही लोकांना अशा भीषण संकटातून जावे लागत आहे.
13 / 15
हाँगकाँगमध्ये लूनर न्यू ईयरच्या च्या सुट्ट्या असल्याने, कोरोना व्हायरसच्या दैनंदिन प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून हे घडत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
14 / 15
हाँगकाँगमधील रुग्णालये 90 टक्के क्षमतेने कार्यरत आहेत आणि काही रुग्णालये इतकी भरलेली आहेत की त्यांना बाहेरील खुल्या जागेत, रस्त्यांवर रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करावी लागते.
15 / 15
कोविड-19 च्या तपासणीसाठी लोकांची संख्याही वाढली आहे. त्यासाठीच मनोरंजन उद्यानासारख्या ठिकाणी तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हायरस पसरण्याच्या भीतीने रेस्टॉरंट्स देखील रिकामी आहेत आणि लोक त्यांच्या घरात बंद आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनEnglandइंग्लंड