शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! अमेरिकेत आठवड्याभरात एक लाखाहून अधिक लहान मुलं पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 7:25 PM

1 / 11
जग कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 52 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 528,405,432 वर पोहोचली आहे. तर 6,302,106 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
2 / 11
जगभरातील अनेक देशांत कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. अमेरिकासारखा प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाला असून तेथील रुग्णांची संख्या संर्वाधिक आहे.
3 / 11
अमेरिकेत कोरोना पॉझिटिव्ह मुलांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकन एकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (एएपी) आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटल असोसिएशनच्या अहवालात असे दिसून आले आहे की गेल्या आठवड्यात यूएसमधील 107,000 हून अधिक मुले कोरोना पॉझिटिव्ह झाली आहेत.
4 / 11
अमेरिकन एकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (एएपी) आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटल असोसिएशनचा हा अहवाल चिंताजनक आहे. कारण अमेरिकेत मुलांची कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे सलग सहाव्यांदा वाढली आहेत.
5 / 11
रिपोर्टनुसार, जेव्हापासून देशात कोरोनाने कहर सुरू केला आहे, तेव्हापासून सुमारे 1.3 कोटी मुलांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी गेल्या चार आठवड्यांत सुमारे 316,000 मुलांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
6 / 11
लस बनवणारी कंपनी फायझरने दावा केला आहे की त्यांनी तयार केलेल्या लसीचे तीन डोस मुलांना संरक्षण देणार आहेत. अमेरिकेत कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता लोकांना आपल्या मुलांना लवकरात लवकर लस द्यायची आहे.
7 / 11
कंपनीने सोमवारी सांगितले की, पाच वर्षांखालील लहान मुलांना कोरोना लस फायझरचे तीन डोस देणे आवश्यक आहे. यामुळे त्यांना सुरक्षा मिळेल. एका चाचणीतही हे समोर आले आहे.
8 / 11
ज्यामध्ये पाच वर्षांखालील मुलांना तीन डोस देण्यात आले. त्यानंतर ते आश्चर्यकारक होते. मुलांना व्हायरसशी लढण्यासाठी अँटीबॉडीज मिळाल्या. फायझर या आठवड्याच्या शेवटी यूएस नियामकांना डेटा प्रदान करण्याच्या तयारीत आहे.
9 / 11
माहितीनुसार, अमेरिकेत सध्या पाच वर्षांखालील 18 मिलियन मुले आहेत ज्यांचं लसीकरण करता येईल. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फायझरची कोरोना लस 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आली होती. तेव्हापासून, केवळ 30 टक्के लस दिली गेली आहे.
10 / 11
फायझरने यापूर्वी सांगितले होते की, 6 महिने ते चार वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांना लसीचा दशांश भाग द्यावा लागेल. मात्र नंतर चाचणी केली असता लसीच्या दोन डोसऐवजी तीन डोस मुलांना देणे आवश्यक असल्याचे समोर आले.
11 / 11
चाचणीत सुमारे 1,600 जणांचा समावेश होता. यात सहभागी झालेल्या मुलांचे वय सहा महिने ते चार वर्षांपर्यंत होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका