शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! फक्त कोरोनाच नाही तर इतरही आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी करते 'लस'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 2:27 PM

1 / 15
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 24 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत.
2 / 15
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 244,468,768 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत जगभरातील कोरोना बळींची संख्या 49 लाखांवर पोहोचली आहे. आतापर्यंत 4,964,517 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
3 / 15
कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. जगातील सर्वच देशात वेगाने लसीकरणाची मोहीम सुरू आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती आता समोर आली आहे.
4 / 15
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना लसीकरणाचे अनेक फायदा आता दिसून येत आहे, कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना संशोधनातून महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
5 / 15
कोरोना लस गंभीर आजार कमी करते आणि रोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी देखील काम करते. पण, त्याचा कोरोना व्यतिरिक्त इतर कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूदरावरही परिणाम होतो का? यासंदर्भात नवं संशोधन आता समोर आलं आहे.
6 / 15
लस घेतलेल्या लोकांमध्ये इतर आजारामुंळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण लस न घेतलेल्यांच्या तुलनेत कमी होतं. Kaiser Permanente यांनी केलेला हा रिसर्च अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) मृत्यू दर साप्ताहिक अहवालात करण्यात आली आहे.
7 / 15
14 डिसेंबर, 2020 ते 31 जुलै, 2021 पर्यंत अमेरिकेत 6.4 दशलक्ष लसीकरण झालेल्या लोकांच्या इलेक्ट्रॉनिक आरोग्य रेकॉर्डच्या संशोधकांनी 4.6 दशलक्ष कोरोना लस न घेतलेल्या लोकांवर रिसर्च केला. यातून ही बाब समोर आणली आहे.
8 / 15
अमेरिकेत फायझर (Pfizer), मॉडर्ना (Moderna) आणि जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) या कंपन्यांकडून कोरोना लस तयार करण्यात येत आहे. फायझर आणि मॉ़डर्ना लसींना संपूर्ण लसीकरणासाठी 2 डोसची आवश्यकता असते.
9 / 15
जॉन्सन आणि जॉन्सनचा एडेनोव्हायरल व्हेक्टर लसीचा फक्त एक डोस आवश्यक असतो. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, ज्या व्यक्तींनी फायझर लस घेतली होती त्यांना पहिल्या डोसनंतर दर हजार लोकांमागे मृत्यूचं प्रमाण 4.2 आणि दुसऱ्या डोसनंतर 3.5 होते.
10 / 15
ज्यांना कोरोना लस मिळाली नाही त्यांच्यामध्ये 11.1 मृत्यू दर नोंदवला गेला होता. ज्यांना मॉडर्ना लस मिळाली, त्यांच्यामध्ये पहिल्या डोस नंतर एक हजार लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण 3.7 आणि दुसऱ्या नंतर 3.4 मृत्यू होते.
11 / 15
ज्यांना लस मिळाली नाही त्यांचा मृत्यू दर 1000 लोकांपैकी 11.1 होता. त्याचवेळी जॉन्सन अँड जॉन्सन लस घेतलेल्या प्रति 1,000 लोकांमध्ये 8.4 मृत्यू झाले. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
12 / 15
जगभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र तरी देखील मृतांचा आकड्याने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. कोरोना व्हायरसचं नवनवीन रुप समोर येत असल्याने धोका आणखी वाढला आहे.
13 / 15
अमेरिकेत कोरोनाचा वेग पुन्हा वाढला आहे. अमेरिकेत संसर्ग झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे तर साथीमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत या प्राणघातक व्हायरसचा कहर वाढला असून लहान मुलांना अधिक धोका आहे.
14 / 15
भारतातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा केला असून चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वेग मंदावत असला तरी काही देशांमध्ये अद्यापही भीषण परिस्थिती आहे.
15 / 15
कोरोनावर लाखो लोकांनी मात केली आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या पाच देशांमध्ये अमेरिका, ब्राझील, भारत, रशिया आणि मेक्सिकोचा समावेश आहे. जगभरातील एकूण मृतांपैकी 50 टक्के मृत्यू याच देशांमध्ये झाले आहेत.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका