शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : भयावह! डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नाकात असतात 1000 पट अधिक व्हायरस; रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 10:44 AM

1 / 15
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 20 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही 201,007,986 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 4,270,236 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 15
कोरोनापुढे अनेक प्रगत देश हतबल झाले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याच दरम्यान डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे.
3 / 15
कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट हा सध्या संपूर्ण जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. या व्हेरिएंटची प्रत्यक्ष संसर्ग क्षमता जाणून घेण्यासाठी सतत रिसर्च सुरू आहे. याच दरम्यान चीनमध्ये (China) केलेल्या एका रिसर्चमध्ये नवी माहिती समोर आली आहे.
4 / 15
रिसर्चनुसार, सामान्य व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नाकात 1000 पटीने अधिक व्हायरस असतात. तसेच कोरोनाचा मूळ वुहान व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट खूपच संसर्गजन्य आणि धोकादायक आहे असं देखील म्हटलं आहे.
5 / 15
डेल्टा व्हेरिएंटमुळे संसर्ग झालेली व्यक्ती अधिक व्हायरस बाहेर टाकते, असं एका संशोधकाचे म्हणणं आहे. म्हणूनच हा व्हेरिएंट अधिक लोकांना संक्रमित करतो. तसेच हा अत्यंत वेगाने देखील पसरत आहे.
6 / 15
चीनचे गुआंगडोंग प्रोविंशियल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅड प्रिवेंशन डिपार्टमेंटचे संशोधक जिंग लू आणि सहकाऱ्यांनी 62 कोरोना बाधितांवर संशोधन केलं आहे. सद्यस्थितीत चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत आहे.
7 / 15
अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे आणि टेस्टिंग-ट्रेसिंगचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) डेल्टा व्हेरिएंटच्या संसर्गजन्य संभाव्यतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
8 / 15
WHO ने म्हटलं होतं की, डेल्टा पॅटर्नशी संबंधित वाढीव प्रसारण क्षमतेमुळे प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होईल आणि विशेषतः कमी लसीकरणाच्या संदर्भात आरोग्य पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव येईल.
9 / 15
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यसाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे,
10 / 15
कोरोनाबाबत आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिएंट' अत्यंत खतरनाक असून 3 पैकी एकाचा मृत्यू होईल असं म्हटलं जात आहे. शास्त्रज्ञांनी हा गंभीर इशारा दिला आहे.
11 / 15
गेल्या दीड वर्षांपासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचं सर्वात जास्त खतरनाक रुप आता समोर आलं आहे. येत्या काळात हा नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक होऊन तीन पैकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागत आहे.
12 / 15
ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे. सायंटिफिक एडव्हायझरी ग्रुप फॉर इमर्जन्सीने याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामुळे जगभर चिंता वाढली आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
13 / 15
रिपोर्टनुसार, कोरोनाचा भविष्यात येणारा व्हेरिएंट MERS व्हेरिएंटपेक्षाही अधिक प्राणघातक असू शकतो. या व्हेरिअंटमुळे जगभरात मृत्यू दर जवळपास 35 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. या संशोधनात केलेल्या दाव्यानुसार, तीन पैकी एकाचा मृत्यू होणं अटळ आहे.
14 / 15
कोरोनाचा भविष्यात येणारा सर्वाधिक घातक व्हेरिएंट हा प्राण्यांपासून येण्याची शक्यता संशोधन करणाऱ्या गटाने वर्तवली आहे. त्यामुळे कोरोनाचा पुढील व्हेरिएंट रोखायचा असेल तर व्हायरस असणाऱ्या प्राण्यांना मारावं लागेल.
15 / 15
कोरोनाच्या या व्हेरिएंटवर कोविड 19 ची लसही कुचकामी ठरू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी रिसर्चमध्ये दिला आहे. जर असं झालं तर जगभर मृत्यूदरात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसDeathमृत्यू