शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! चिमुकल्यांमध्ये कोरोनाची दीर्घ लक्षणे दुर्मिळ; रिसर्चमधून दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 12:58 PM

1 / 14
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांची संख्या ही 20 कोटींवर पोहोचली असून कोरोनाने 42 लाखांपासून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. वेगाने पसरणाऱ्या व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2 / 14
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान चिमुकल्यांना देखील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं म्हटलं जात आहे.
3 / 14
कोरोनाच्या संकटात आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाची दीर्घ लक्षणे दुर्मिळ असल्याची माहिती आता समोर आली आहे. रिसर्चमधून हा दावा करण्यात आला आहे.
4 / 14
कोरोना झालेली बहुतांश लहान मुले सहा दिवसांत बरी होत असल्याचं दिसून आलं आहे. चार आठवड्यांच्या पुढे लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे कायम राहिल्याची उदाहरणे अत्यंत दुर्मिळ आहेत असं ब्रिटनमधील रिसर्चमधून समोर आलं आहे.
5 / 14
द लॅन्सेट चाइल्ड अँड एडोलसेन्ट हेल्थ जर्नलमध्ये हा रिसर्च प्रसिद्ध झाला आहे. मुलांच्या पालकांनी स्मार्टफोन Appमध्ये भरलेल्या माहितीच्या आधारावर हा रिसर्च करण्यात आला. यात पाच ते 17 वर्षे वयोगटातील हजारो मुलांच्या माहितीचा समावेश आहे.
6 / 14
कोरोनाची लक्षणे असणाऱ्या वीसपैकी एकाहून कमी मुलांमध्ये चार आठवड्यांपेक्षा जास्त लक्षणे होती, तर जवळपास सर्व मुले आठ आठवड्यांनी पूर्णपणे बरे झाली, असे किंग्ज कॉलेज लंडनच्या संशोधकांनी केलेल्या रिसर्चमध्ये आढळून आले.
7 / 14
लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील प्राध्यापक एम्मा डंकन यांनी कोरोनाची दीर्घकाळ टिकणारी लक्षणे असलेल्या मुलांची संख्या कमी आहे, हे आश्वासक असले तरीही काही मुले कोरोनासह दीर्घकाळापर्यंत आजारी राहू शकतात असं म्हटलं आहे.
8 / 14
कमीत कमी 84 टक्के लहान मुलांमध्ये या आजारादरम्यान थकवा जाणवत होता आणि तेच याचं लक्षण आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 14
कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता RS व्हायरसचे थैमान घातले आहे. नवजात बाळांनाही या व्हायरसने विळखा घातल्याची माहिती मिळत आहे. कोरोना, डेल्टा व्हेरिएंटनंतर आता अमेरिकेत RSV अर्थातच रेस्पिरेटरी सिन्शियल व्हायरस आढळून आला आहे.
10 / 14
अगदी 2 आठवड्यांच्या नवजात बाळापासून ते 17 वर्षांच्या मुलांपर्यंत अनेकजण या व्हायरसच्या विळख्यात सापडत आहेत. अमेरिकेत आता डेल्टासोबतच RS व्हायरसबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
11 / 14
सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला तर काय करायचं? हा प्रश्न आता तज्ज्ञांना सतावू लागला आहे.
12 / 14
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन संस्थेनं जारी केलेल्या आकडेवारीचा आधार घेत न्यूयॉर्क टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. यामध्ये जून महिन्यापासून अमेरिकेत RSV बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. जुलै महिन्यात या व्हायरस बाधित रुग्णांचा दर खूपच जास्त होता.
13 / 14
RSV ची लागण झाल्यावर नाक वाहणं, खोकला येणं, शिंका येणं आणि ताप यासारखी लक्षणं दिसू शकतात. ह्युस्टनमधील टेक्सास चिल्ड्रन हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ हीदर हक याबाबत एक ट्विट केलं आहे.
14 / 14
'गेल्या काही महिन्यांपासून शून्य ते अगदी नवजात बालकांना कोरोना व्हायरसची लागण होतं आहे. नवजात बालकं, लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण वाढलं आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे' असं हीदर हक यांनी म्हटलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यू