CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! "येत्या दोन आठवड्यात परिस्थिती गंभीर, वेगाने रुग्णसंख्या वाढणार", तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 5:51 PM
1 / 17 कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील रुग्णांची संख्या ही तब्बल 13 कोटींवर गेली आहे. लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागत असून अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 / 17 कोरोना रुग्णांच्या संख्येत आता झपाट्याने वाढ होत असून वेगाने होणाऱ्या संसर्गाने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही देशांमध्य़े अत्यंत बिकट परिस्थिती आहे. 3 / 17 कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. 4 / 17 मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेण्यात येत आहे. मात्र तरी देखील कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. याच दरम्यान आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. 5 / 17 येत्या दोन आठवड्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग जगभरात थैमान घालणार असून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज अमेरिकन साथीचा रोग विशेषज्ञ मायकल ओस्टरहोम यांनी वर्तवला आहे. 6 / 17 मायकल ओस्टरहोम हे मिनेसोटा विद्यापीठातील सेंटर फॉर इंफेक्शियस डिजीज रिसर्च अँड पॉलिसी विभागाचे संचालक आहे. अमेरिकन वाहिनी एनबीसीसोबत एका शोमध्ये बोलताना त्यांनी कोरोनाबाबत अंदाज वर्तवला आहे 7 / 17 ओस्टरहोम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महासाथीचा आजार पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळासारखा आहे. येत्या काही दिवसात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ही संख्या आतापर्यंतच्या रुग्णांपेत्रा अधिक असणार आहे. 8 / 17 पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळासारख्या परिस्थितीचा सामना संपूर्ण जग करत आहे. अमेरिकेबाबत सांगायचं झालं तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली असून ही संख्या आणखी वाढणार असल्याचं देखील ओस्टरहोम यांनी म्हटलं आहे. 9 / 17 जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसारस डिसेंबर 2020 मध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. लसीकरणानंतर कोरोना संसर्गाला काही प्रमाणात अटकाव झाला असल्याचे म्हटले जात आहे. 10 / 17 लसीकरण वेगहाने सुरू असतानाही भारत, अमेरिका, ब्राझील, इटली आणि जर्मनी आदी देशांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 11 / 17 अमेरिकेचे संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. अँथोनी फॉसी यांनी शनिवारी इशारा देताना अमेरिकन नागरिकांनी काळजी न घेतल्यास अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे. 12 / 17 सार्वजनिक आरोग्याचे उपाय वेगाने वाढवण्याची आवश्यकता आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणावर केल्यास बाधितांच्या वाढत्या संख्येला अटकाव करता येऊ शकतो. आता पर्यंत कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. 13 / 17 जगातील सर्वच देश कोरोनाचा संकटाचा सामना करत आहेत. प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले असून काही ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 14 / 17 ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. सर्वात मोठं शहर असलेल्या असलेल्या साओ पाउलोमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचे मृतदेह दफन करण्यासाठी कब्रिस्तानमध्ये आता जागाच शिल्लक राहिलेली नाही. 15 / 17 कोरोनामुळे भयावह परिस्थिती असून कर्मचाऱ्यांकडून जुने सांगाडे बाहेर काढण्यात येत आहेत आणि त्याठिकाणी नवीन मृतदेहांसाठी जागा तयार केली जात आहे. गेल्या एका आठवड्यात ब्राझीलमध्ये जवळपास 60 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. 16 / 17 काही वर्षांपूर्वी दफन केलेल्या कबरींवरील वरील भाग काढण्यात येत असून तेथील सांगाडे काढण्यात येत आहे. साओ पालोमधील ब्राझीलमधील सर्वात मोठ्या कब्रस्तानापैकी एक असलेल्या विला फोरमोसा सिमेट्रीमध्ये कर्मचारी मास्क, पीपीई किट घालून दिवस-रात्र कबर खोदत आहेत. 17 / 17 ब्राझीलमधील या सर्वात मोठ्या शहरात अनेक कबरी खोदण्यात आल्या. मृतदेहांसाठी जागा अपुरी पडत होती. कोरोनामुळे मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने कबरी खोदण्याचे काम अनेक ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. आणखी वाचा