शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! कोरोना मृतांच्या संख्येत तब्बल 21 टक्क्यांनी वाढ, 20 कोटींहून अधिक असणार रुग्ण; WHO चा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 8:39 AM

1 / 15
कोरोनाच्या महाभयंकर साथीने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
2 / 15
जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 19 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
3 / 15
रुग्णसंख्या वाढत असल्याने काही देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. प्रगत देश देखील या महाभयंकर संकटापुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान WHO ने एक गंभीर इशारा दिला आहे.
4 / 15
कोरोना मृतांच्या संख्येत तब्बल 21 टक्क्यांनी वाढ झाली असून येत्या दोन आठवड्यात रुग्णांची संख्या ही 20 कोटींहून अधिक असणार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. कोरोनाचा सर्वत्र कहर पाहायला मिळत आहे.
5 / 15
कोरोनाग्रस्तांच्या वाढीचा दर असाच कायम राहिल्यास येत्या दोन आठवड्यांमध्ये जगभरातील रुग्णांची संख्या 20 कोटीहून अधिक होईल. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट यामागचं मुख्य कारण असल्याचं म्हटलं जात आहे.
6 / 15
जगभरातील कोरोना बळींचा आकडा वाढून तो आता 40 लाखांहून अधिक झाला आहे. रुग्णांची सर्वाधिक नोंद अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया, ब्रिटन आणि भारतात नोंदवण्यात आली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले.
7 / 15
रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, अधिक वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट हा आणखी आठ देशांमध्ये पसरला आहे. त्यामुळे आता तो आता एकूण 132 देशांमध्ये आढळून येत आहे.
8 / 15
अनेक देशांमध्ये लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रय़त्न केले जात आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 15
अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटीचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत आता पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आहे.
10 / 15
एका दिवसात कोरोनाचे तब्बल 1 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढली आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे.
11 / 15
कोरोनाने रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याबाबतचे नवीन नियम तयार केले आहेत. गेल्या आढवड्याच्या तुलनेत ही रुग्णसंख्या चिंताजनक आहे.
12 / 15
सर्वाधिक रुग्णसंख्या ही फ्लोरिडा (38,321), टेक्सास (8,642), कॅलिफोर्निया (7,731), लुइसियाना (6,818), जॉर्जिया (3,587), यूटाह (2,882), अलबामा (2,667), आणि मिसॉरी (2,414) मध्ये आहे. सध्या 40,000 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
13 / 15
अमेरिकेत कोरोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या भागांमधील लस घेतलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा मास्क घालावा लागणार आहे. आरोग्य प्रशासनाने लसीकरण झालेल्या या नागरिकांना मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत.
14 / 15
Centers for Disease Control and Prevention च्या संचालकांनी पत्रकार परिषदेत मास्क वापरण्यासंबंधी निर्देश दिले. डेटानुसार लस अत्यंत प्रभावी आहे, मात्र डेल्टाच्या काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका असल्याचं म्हटलं आहे.
15 / 15
संसर्गाचं प्रमाण जास्त तसेच धोकादायक ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना घरांमध्येही मास्क वापरण्याची शिफारस सीडीसी करत असल्याचं म्हटलं आहे. डेल्टा व्हेरिंएंटमुळे धोका अधिक वाढला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाDeathमृत्यूAmericaअमेरिका