CoronaVirus Live Updates : सुखावणारी आकडेवारी! कोरोनाच्या संकटात WHO ने दिली आनंदाची बातमी; जगभरातील रुग्णसंख्येत झाली घट By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 7:38 PM1 / 12कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईल, आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. 2 / 12जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 22 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 227,406,211 वर पोहोचली आहे. तर 4,676,452 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर 204,117,716 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. 3 / 12जगभरातील अनेक देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. विविध ठिकाणी संशोधन करण्यात येत आहे. याच दरम्यान आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाच्या संकटात एक आनंदाची बातमी दिली आहे. 4 / 12WHO ने दिलासादायक माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात जगभरात नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मागील दोन महिन्यांच्या काळात पहिल्यांदा झालेली ही मोठी घट आहे. जगातील सर्वच भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच बळींच्या संख्येतही घट झाली आहे.5 / 12जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या ही दक्षिण-पूर्व आशिया भागात झाली आहे. तर आफ्रिकेमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू दरात सात टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिका, ब्रिटन, भारत, इराण आणि तुर्कीमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. 6 / 12वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग तब्बल 180 देशांमध्ये झाला आहे. अनेक ठिकाणी तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट हा अधिक घातक असल्याचं म्हटलं जात आहे. 7 / 12जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, वयस्करांच्या तुलनेत कोरोना व्हायरची लागण मुलांना आणि तरुणांना कमी प्रमाणात होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण होत असल्याचेही समोर येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तसेच तरुणांचा मृत्यूदर देखील कमी आहे. 8 / 12फ्रान्समध्ये सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, त्यांना कामावर रुजू होण्यास मनाई करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये जवळपास तीन लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना लस घेतलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 12भारतात कोरोना लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. देशात कोरोना लसीचे तब्बल 75 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. तर दुसरीकडे कोरोना लसीकरणासाठी जागतिक आरोग्य संघटनेने भारताचं अभिनंदन करत कौतुक केलं आहे. 10 / 12मनसुख मांडविया यांनी सोमवारी 'या वर्षी जानेवारी महिन्यात लसीकरणाची देशव्यापी मोहीम सुरू झाल्यापासून भारतात 75 कोटींहून अधिक कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत. जर याच वेगात लसीकरण सुरू राहिले तर डिसेंबरपर्यंत देशातील 43 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण होईल' असं म्हटलं आहे. 11 / 12'नरेंद्र मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास' या मंत्राने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देशाने 75 कोटी डोसचा आकडा पार केला आहे' असं देखील म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताचे अभिनंदन केले आहे आहे. कोरोना लसीकरण वेगात करत असल्यामुळे भरभरून कौतुक केलं आहे. 12 / 12डब्ल्यूएचओ दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी 'डब्ल्यूएचओने अभूतपूर्व वेगाने कोरोना लसीकरण केल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले. पहिले 100 दशलक्ष डोस वितरीत करण्यासाठी भारताला 85 दिवस लागले. दरम्यान, भारताने फक्त 13 दिवसांत 650 दशलक्ष कोरोना डोसपासून 750 दशलक्ष कोरोना डोस देण्याचा टप्पा पूर्ण केला आहे' असं म्हटलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications