coronavirus lockdown fine across the world icluding australia and italy? vrd
Coronavirus: लॉकडाऊनचे नियम मोडल्यास 'या' देशांमध्ये मोठी शिक्षा; घराबाहेर पडल्यास झाडणार गोळ्या By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2020 3:30 PM1 / 11कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. घराबाहेर न पडण्याच्या नागरिकांना वारंवार सूचना करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं असल्याचं सरकारनं अधोरेखित केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात जवळपास ९० देशांमध्ये लॉकडाऊन आहे. संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार जगभरात १८० देशांमध्ये शाळा-कॉलेज बंद करण्यात आले आहेत. जगभरातल्या देशात लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यास वेगवेगळे कायदे आहेत. सौदी अरेबियात कोरोनाचा संसर्ग झाल्याचं लपवल्यास १ कोटी रुपयांचा दंड आहे. 2 / 11कोरोनाचा सर्वाधिक फटका हा इटलीला बसला आहे. इटलीत कोरोनाच्या संसर्गामुळे १५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत कामाशिवाय घराबाहेर पडल्यास २.५ लाख रुपयांचा दंड ठोठावला जातोय. आतापर्यंत या कायद्यांतर्गत ४० हजारांहून अधिक लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. 3 / 11हाँगकाँगमध्ये क्वारंटाइनचे नियम मोडल्यास २.५ लाखांचा दंड आणि ६ वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.4 / 11सौदी अरेबियातही कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती लपवणे आणि प्रवासाचा इतिहास न सांगितल्यास १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला जातोय. जो इतर देशांच्या तुलनेत मोठा आहे. 5 / 11ऑस्ट्रेलियामध्ये लॉकडाऊनचे नियम मोडल्यास २३ लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. 6 / 11रशियामध्ये क्वारंटाइनचे नियम तोडल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 7 / 11मॅक्सिकोत या आजाराची माहिती लपवल्यास ३ वर्षं जेलची हवा खावी लागू शकते. 8 / 11राष्ट्रपती रोडिगो दुतेर्ते यांच्या आदेशानुसार क्वारंटाइन नियमाचं उल्लंघन केल्यास गोळी घालण्यास सांगण्यात आलं आहे. 9 / 11दक्षिण आफ्रिकेत जर विनाकारण घराबाहेर पडलात तर पोलीस रबराच्या गोळ्या तुमच्यावर झाडणार आहे. 10 / 11पेरूमध्येही सरकारनं कोरोनासाठी हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. परंतु जर कोरोना हेल्पलाइनवर खोटी माहिती दिल्यास ४५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. 11 / 11पनामामध्ये महिला-पुरुष एकाच दिवशी घराबाहेर पडू शकत नाहीत. एक दिवस महिलेनं, तर दुसऱ्या दिवशी पुरुषानं घराबाहेर पडण्याचा तिथे कायदा आहे. जसे की, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी फक्त दोन तासांसाठी महिला घराबाहेर पडू शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications