CoronaVirus : malaria drug shows no benefit in another coronavirus study vrd
CoronaVirus : भारताच्या 'गेमचेंजर' औषधानं केलं निराश; जगभरात होता आशेचा किरण By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 1:13 PM1 / 14कोरोनाच्या उपचारात वापर होत असलेल्या मलेरियाच्या औषधासंदर्भात एक नवीन अभ्यास समोर आला आहे. 2 / 14कोरोना विषाणूच्या रुग्णांना हे औषध कोणत्याही प्रकारचा लाभ देत असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असं अभ्यासामध्ये म्हटले आहे. 3 / 14हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधावर करण्यात आलेला हा अभ्यास न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. 4 / 14अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या औषधाचे वर्णन गेम चेंजर म्हणून केले होते, तसेच बरेच देश भारतातून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आयात करीत आहेत. 5 / 14कोलंबियामधील विद्यापीठात सुमारे 1,400 उपचार घेणाऱ्या रुग्णांवर याचा अभ्यास करण्यात आला असल्याचे संशोधकांनी सांगितले. 6 / 14संशोधनात असे दिसून आले आहे की, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन कोरोना रुग्णांमध्ये मृत्यूची जोखीम कमी करत नाही किंवा तसेच श्वासोच्छवासाची समस्याही सोडवत नाही. 7 / 14हा अभ्यास कोणत्याही प्रयोगासाठी नव्हे तर केवळ निरीक्षणासाठी करण्यात आला आहे. 8 / 14काही डॉक्टरांनी असे लिहिले आहे की, हा अभ्यास अनेक महत्त्वपूर्ण सूचना देतो आणि त्यामधून कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांवर बरेच महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात.9 / 14डॉक्टरांनी अभ्यासात लिहिले आहे की, 'हे निराशाजनक आहे की इतक्या दिवसानंतरही या साथीच्या रोगावर औषध तयार करण्यात आलेलं नाही. 10 / 14त्याचदरम्यान हा नवीन अभ्यास हे दर्शवितो की, हायड्रोक्सीक्लोरोक्विन एक रामबाण औषध नाही. 11 / 14या अभ्यासाच्या सुरुवातीस, हृदयाचा ठोका वाढणे आणि अचानक मृत्यू ओढावण्यासारखे गंभीर दुष्परिणाम सांगितले गेले होते.12 / 14अमेरिकेच्या फूड अॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननेही कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी हे औषध न वापरण्याचा इशारा दिला आहे.13 / 14अमेरिकेमध्ये कोरोनाचं थैमान वाढत चाललं असून, तिथले वैज्ञानिक त्यावर लस विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत.14 / 14अमेरिकेमध्ये कोरोनाचं थैमान वाढत चाललं असून, तिथले वैज्ञानिक त्यावर लस विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications