शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 9:21 PM

1 / 9
अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत एक लाखहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. तर संक्रमितांची संख्या 17 लाखच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिकेचे हे आकडे जगात सर्वाधिक आहेत. कोरोनाने संपूर्ण जगालाच हादरा दिला आहे. मात्र, सर्वात वाईट स्थिती आहे, ती अमेरिकेचीच. असे असताना, एक प्रश्न सर्वांनाच पडला आहे, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि सुपरपावर म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेची, अशी अवस्था का झाली? अमेरिका नेमकी कुठे चुकली.
2 / 9
सर्व प्रकारची संसाधने आणि उत्तम प्रकारची आरोग्य सेवा असलेली अमेरिका कोरोना व्हायरससमोर एवढी हतबल का झाली. सध्या संपूर्ण जगातच चर्चा सुरू आहे, की अमेरिकेकडून या व्हायरसचे गांभीर्य ओळखण्यात चूक झाली, की हे जाणूनबुजून केलेल्या दुर्लक्षाचं फळ आहे. ज्याचा परिणाम आज संपूर्ण अमेरिकेतील जनतेला भोगावा लागत आहे.
3 / 9
सुरुवातील व्हायरसकडे दुर्लक्ष करणे - अमेरिकेने सुरुवातीला कोरोना व्हायरसला गांभीर्याने घेतले नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने म्हणत होते, की कोरोना व्हायरसचा अमेरिकन लोकांवर फारसा परिणाम होणार नाही. कोरोना व्हायरसचे काही रुग्ण आढळताच जगातील अनेक देशांनी कठोर पावले उचलली. मात्र, ट्रम्प यांनी आपल्या नागरिकांवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध लादले नव्हते.
4 / 9
टेस्टिंगमध्ये हलगर्जीपणा - अमेरिकेत कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारी महिन्यात आढळला होता. असे असतानाही येथे टेस्टिंगचे प्रमाण फार कमी होते. दोन महिन्यांत वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर येथे वेगाने कोरोना टेस्टिंग केली गेली. न्यू यॉर्कमधील नेत्यांनीही कोरोनाच्या एवढ्या मोठ्या फैलावासाठी ट्रम्प आणि टेस्टिंग प्रणालीलाच जबाबदार धरले आहे.
5 / 9
आवश्यक उपकरणांची कमतरता - सुपरपावर अमेरिकेकडच्या इमरजन्सी मेडिकल किटदेखील कोरोना व्हायरसपुढे कुचकामी ठरल्या. एवढेच नाही, तर मेडिकल सप्लाय, मास्क आणि व्हेंटिलेटरच्या कमतरते विरोधात येथील डॉक्टरच रस्त्यावर उतरले होते. येथील सीडीसीच्या डायग्नोस्टिक किटमध्येही विविध प्रकारच्या कमतरता दिसून आल्या. याचा परिणाम टेस्टिंगवर झाला आणि कोरोनाला पसरण्याची संधी मिळाली.
6 / 9
सोशल डिस्टन्सिंगच्या पालनाला उशीर - इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत सोशल डिस्टंसिंगच्या पालनाला उशिरा सुरुवात झाली. कोलंबिया विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार, अमेरिकेने दोन आठवड्यांपूर्वीच सोशल डिस्टेंसिंगला सुरुवात केली आहे. जर हा निर्णय आधी घेतला गेला असता, तर किमान 36,000 लोकांचा जीव वाचला असता.
7 / 9
मास्क लावणे बंधनकारक नाही - कोरोना व्हायरसचा धोका ओळखता संपूर्ण जग मास्कचा वापर करत आहे. मात्र, अमेरिकेत अजूनही अनेक लोक, मास्क आवश्यक आहे की नाही यावरच चर्चा करत आहेत. येथे सार्वजनिक ठिकाणीही अनेक लोक मास्क घालताना दिसत नाहीत, यामुळे येथील कोरोना रुग्णांत सातत्याने वाढ होत आहे. एवढेच नाही, तर खुद्द ट्रम्पदेखील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत मास्क न परिधान करताच सामील झाले आहेत.
8 / 9
लॉकडाउनला उशीर - अमेरिकेत लॉकडाउनचा निर्णय फार उशिराने घेण्यात आला. तोपर्यंत कोरोनाने अमेरिकेच्या अनेक भागांना आपल्या कवेत घेतले होते. खरे तर हा लॉकडाउनही फार कडक नव्हता. तसेच यात सूटही फार लवकरत दिली गेली. अमेरिकेच्या अनेक राज्यांत चित्रपटगृहे, बार, रेस्टॉरन्ट आणि सलून अशा वेळी सुरू झाले, जेव्हा तेथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत होते. अताही ट्रम्प अमेरिका पूर्णपणे सुरू करण्यासंदर्भात बोलत आहेत.
9 / 9
उड्डानांवर प्रतिबंध घालण्यास उशीर - अमेरिकेत विमान सेवांसदर्भातील निर्णयही फार उशिरा घेण्यात आला. जानेवारीत पहिला रुग्ण समोर आल्यानंतर मार्च महिन्यात येथे ट्रॅव्हलिंगवर बंदी घालण्यात आली. ब्राझीलमधील कोरोना व्हायरसबाधितांची संख्या वाढल्यानंतर नुकतीच तेथून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना बंदी घालण्यात आली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प