शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: 'या' देशात मोठी Tragedy बनलाय कोरोना, मृतदेह दफनायलाही कमी पडतेय जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 6:09 PM

1 / 9
सध्या संपूर्ण जगात कोरोना थैमान घालत आहे. मात्र आता, ब्राझील त्याचे नवे केंद्र बनू लागला आहे. दक्षिण अमेरिकेतील हा देश कोरोनाबाधितांच्या बाबतीत रशियालाही मागे टाकत जगात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
2 / 9
ब्राझीलमध्ये गेल्या 48 तासांत कोरोना संक्रमितांचा आकडा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कोरोनामुळे येथे गेल्या 24 तासांत तब्बल 1179 जणांचा मृत्यू झाला. यावरूच तुम्हाला ब्राझीलमधील परिस्थितीचा अंदाज लावता येईल.
3 / 9
कोरोनामुळे ब्राझीलची स्थिती एवढी खराब झाली आहे, की तेथील सर्वात मोठ्या स्मशानभूमीतही मृतदेह दफन करण्यासाठी जागा कमी पडत आहे. अनेक लोक तर आपल्या नातलगांचे मृतदेह रस्त्यावर आणि स्मशानभूमीबाहेर सोडून जात आहेत. यापूर्वी 12 मेरोजी तेथे एकाच दिवसात 881 जणांचा मृत्यू झाला होता.
4 / 9
ब्राझीलमधील कोरोनाबाधितांचा आकडा आता 3,19,000च्याही पुढे गेला आहे. तर 20,541 जणांचा मृत्यू झाला आहे.
5 / 9
ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होण्याचे प्रमाण एवढे वाढले आहे, की त्यांचे दफन करण्यासाठी स्मशानभूमीत जागाही कमी पडू लागली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलमधील परिस्थिती आणखी खराब होण्याची शक्यता आहे.
6 / 9
ब्राझीलच्या साओ पाउलो येथे लॅटिन अमेरिकन देशांची सर्वात मोठी स्मशानभूमी आहे. विला फोर्मोसा, असे या स्मशानभूमीचे नाव आहे. या स्मशानभूमीती कर्मचारी आता 8 ऐवजी 12 तासांची ड्यूटी करत आहेत. तरीही सर्व मृतदेह दफन करण्याचे काम अपूर्णच राहत आहे.
7 / 9
कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसर, एक मृतदेह दफन होत नाही, तोच 15 नवे मृतदेह येत आहेत. आता तर तेथे रात्रीच्या वेळीही मृतदेह दफन करण्याचे काम सुरू आहे. मात्र, रोजच्या रोज मोठ्या प्रमाणावर मृतदेह येत असल्याने तेथेही जागा कमी पडू लागली आहे.
8 / 9
येथे अनेक जण आपल्या कुटुंबीयाचा मृतदेह दफन करण्यासाठी वाट पाहत आहेत. तर अनेक लोक मृतदेह रस्त्यावर आणि स्मशानभूमीबाहेरच सोडून जात आहेत.
9 / 9
साओ पाउलो स्मशान भूमीतील हे दृश्य अक्षरश: मन हेलावून टाकणारे आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBrazilब्राझीलAmericaअमेरिका