शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 4:19 PM

1 / 8
अमेरिकेतील एका कंपनीने, कोरोना व्हायरसवरील 'औषध' शोधून काढल्याचा दावा केला आहे. फॉक्स न्यूजच्या एका वृत्तानुसार, कॅलिफोर्नियातील बायोटेक कंपनी Sorrento Therapeuticsने म्हटले आहे, की त्यांनी STI-1499 नावाची अँटीबॉडी तयार केली आहे.
2 / 8
कंपनीने म्हटले आहे, की पेट्री डिश एक्सपेरिमेंटमध्ये, STI-1499 अँटीबॉडी कोरोना व्हायरसला मानवी पेशींमध्ये संसर्ग पसवण्यापासून 100 टक्के रोखते, असे या संशोधनातून समोर आले आहे.
3 / 8
सोरेन्टो कंपनी न्यू यॉर्क येथील माउंट सिनई स्कूल ऑफ मेडिसीनसोबत विविधप्रकारच्या अँटीबॉडीज तयार करत आहे. विविध प्रकारच्या अंटीबॉडी एकत्रित करून 'औषधाचे कॉकटेल' तयार करण्याचीही यांची योजना आहे.
4 / 8
डेली मेलच्या वृत्तानुसार, सोरेन्टो कंपनीने एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे, की ते एका महिन्यातच अँटीबॉडीचे 2 लाख डोस तयार करू शकतात.
5 / 8
या कंपनीने STI-1499 अँटीबॉडी वापराची मंजुरी मिळावी यासाठी अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज एडमिनिस्ट्रेशनला (FDA) पत्रही केले आहे. या कंपनीने इमरजन्सी आधारावर मंजूरीची मागणी केली आहे.
6 / 8
या कंपनीच्या दाव्यानंतर, स्टॉकच्या भावात 220 टक्क्यांची वृद्धी झाल्याचे बघायला मिळाले. सोरेन्टोचे सीईओ डॉ. हेनरी जी यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना सांगितले, 'आम्ही सांगू इच्छितो, की यावर एक इलाज आहे. हा इलाज 100 टक्के गुणकारी आहे.'
7 / 8
सीईओ डॉ. हेनरी म्हणाले, तुमच्या शरीरात व्हायरसला न्यूट्रलाइज करन्यासाठी अँटीबॉडी उपस्थित असतील, तर तुम्हाला सोशल डिस्टंसिंगचीही आवश्यकता नाही. त्यामुळे कुठलीही चिंता न करता बंधने हटवली जाऊ शकतात.
8 / 8
या अँटीबॉडीची टेस्ट अद्याप, केवळ लॅबमध्ये मानवी पेशींवरच करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मानवावर या औषधाचे परीक्षण अद्याप करण्यात आलेले नाही. अँटीबॉडीचे काही साइड इफेक्ट्स आहेत का? याची खात्रीही अद्याप झालेली नाही. तसेच मानवी शरीरात ही अँटीबॉडी कशापद्धतीने काम करते हेही अद्याप समजलेले नाही.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याUSअमेरिकाAmericaअमेरिकाUnited StatesअमेरिकाCaliforniaकॅलिफोर्निया