CoronaVirus Marathi News china approves emergency use covid19 vaccines sinopharm
CoronaVirus News : रशियानंतर 'या' देशाने तयार केली कोरोना लस; आपत्कालीन स्थितीत 2 लसींना मंजुरी By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 8:51 AM1 / 14जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून धडकी भरवणारा ग्राफ सातत्याने समोर येत आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 2 / 14कोरोनामुळे अनेक देशांतील परिस्थिती गंभीर आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आठ लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. 3 / 14कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. 4 / 14कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. याच दरम्यान रशियाचे राष्ट्रपती ब्लादमीर पुतीन यांनी कोरोना लस तयार झाल्याची घोषणा केली आहे. 5 / 14रशियाने या लसीला ‘स्पुटनिक व्ही’ असे नाव दिले आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडूनही कोरोनावरील या लसीला मान्यता देण्यात आली आहे. 6 / 14रशियाकडून SputnikV वेबसाईट देखील लाँच करण्यात आली आहे. रशियानंतर आता आणखी एका देशाला आपत्कालीन स्थितीत 2 लसींना मंजुरी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 7 / 14चीनमध्ये काही निवडक कंपन्यांनी मिळून तयार केलेल्या दोन लसींना आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्याची मंजुरी मिळाली असल्याची माहिती चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. 8 / 14संक्रमणाचा धोका ज्या व्यक्तींना सर्वात जास्त आहे अशा रुग्णांवर याचा वापर करता येणार आहे. मेडिकल कन्सेन्ट फॉर्म, साईड इफेक्ट्स मॉनिटर करण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. 9 / 14चीनच्या कोरोना व्हायरस लसीकरण विकास टास्क फोर्सचे प्रमुख झेंग झॉन्गवी यांनी सरकारी सीसीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय नियम पाळून ही लस दिली जाणार आहे.10 / 14लस दिल्यानंतर रुग्णांची निरीक्षणं नोंदवण्यात येणार असून त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्यात येईल. या लशीचे होणारे दुष्परिणाम आणि नुकसान याचा विचार करून एक विशेष पॅकेज तयार करण्यात आलं आहे. 11 / 14चीनमधील दोन्ही लसींना फक्त आपत्कालीन स्थितीत वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी येत्या काही दिवसांत खूप लोकांना ही लस देण्यावर अधिक भर असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 12 / 14फूड मार्केट, ट्रान्सपोर्ट सिस्टम आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांपर्यंत कोरोनाची लस पोहोचवण्याचं काम केलं जाईल असंही सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 13 / 14कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वच देश सज्ज झाले असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश येत आहेत. तसेच खबरदारीचे सर्व उपाय हे केले जात आहेत. 14 / 14जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 23,583,616 वर पोहोचली आहे. तर 812,513 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तब्बल 16,080,573 लोकांनी कोरोनावर मात करून कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications